राज्यपालांच्या विशेषाधिकारामुळे डॉ. सुनील पोखरणांचे निलंबन रद्द

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणांचे निलंबन करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले होते.
Ahmednagar District Hospital
Ahmednagar District HospitalDatta Ingale

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भाऊबिजेच्या दिवशी ( 6 नोव्हेंबर 2021 ) कोविड रुग्ण असलेल्या अतिदक्षता विभागाला आग लागली. या घटनेमुळे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणांचे निलंबन करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले होते. या संदर्भात डॉ. पोखरणा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार राज्यपालांनी त्यांचे विशेषाधिकार वापरत पोखरणा यांचे निलंबन रद्द केले आहे. ( Due to the privilege of the Governor, Dr. Sunil Pokharana's suspension canceled )

जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली. त्यावेळी या विभागात 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 14 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही घेतली होती. तसेच राज्यातील आरोग्य मंत्र्यांनीही घटना स्थळाला भेट देऊन संबंधितांवर कारवाईचे व चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेची नाशिक महसूल विभागीय आयुक्त व पोलिस प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी होऊन कारवाई झाली होती. या कारवाईत पोखरणा यांच्या निलंबनाचा समावेश होता. घटनेनंतर आठवड्या भरातच पोखरणा यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने पोखरणा यांना अटकपूर्व जामीन दिला होता.

Ahmednagar District Hospital
नगर रुग्णालय आग : डॉक्टर, तीन परिचारिका यांना जामीन

नाशिक विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार व वाढता दबाव लक्षात घेता राज्य सरकारने पोखरणा यांच्यासह चार जणांचे निलंबन केले होते. अखेर पोखरणा यांचे निलंबन राज्यपालांनी आज रद्द केले आहे. डॉ. पोखरणा यांची बदली पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पदावर झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com