Balasheb Patil : 'थेट जनतेतून' संकल्पनेमुळे विकासाला ब्रेक लागणार...बाळासाहेब पाटील

महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Aghadi Government जिल्हा परिषदेचे ZP गट, पंचायत समितीचे Panchyat Samiti गण हे गटातील संख्या लोकसंख्येच्या आधारे Based on population वाढवली होती.
Balasaheb Patil, Eknath Shinde
Balasaheb Patil, Eknath Shindesarkarnama

कोपर्डे हवेली : नव्या सरकारच्या जुन्या धोरणांमुळे अनेक नवयुवकांना संधी मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येच्या प्रमाणात पालिका प्रभाग, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यांची संख्या वाढविण्याच्‍या निर्णयाला नव्या सरकारने स्थगिती देत केलेल्या बदलाचे दुष्परिणाम भविष्यात दिसतील, असे मत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. थेट जनतेतून ही संकल्पना विकासाला ब्रेक लावणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटन, भूमिपूजनप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण हे गटातील संख्या लोकसंखेच्या आधारे वाढवली होती.

Balasaheb Patil, Eknath Shinde
वैरत्व विसरून उदयनराजे, बाळासाहेब पाटील यांची बंद खोलीत चर्चा...

नव्या सरकारने ती संख्या कमी केल्याने अनेकांना संधी मिळणार नाही. थेट जनतेतून ही संकल्पना विकासाला ब्रेक लावणारी आहे. नगरपालिका, ग्रामपंचायतीत सरपंच एका गटाचा तर सदस्य संख्याबळ दुसऱ्याचे असल्यास विकासास खीळ बसून त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in