राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून सत्ताधाऱ्यांच्या मताला सुरुंग; सूनबाईंचा १६ मतांनी पराभव

राजकीय डावपेचातून काहींचा करेक्ट कार्यक्रम होता होता वाचल्याचे दिसून येत आहे.
 Vaishali Sathe-Baliram Sathe
Vaishali Sathe-Baliram SatheSarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी संचालकांच्या शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी सरासरी १०० मतांच्या फरकाने विजय मिळविला. मात्र विरोधातील दूध संघ बचाव कृती समितीच्या पॅनेलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (baliram sathe) यांच्या सूनबाई वैशाली साठे यांनी तब्बल १४४ मते घेतली आहे. त्यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव झाला आहे, त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील मते फुटल्याचे स्पष्ट आहे. काही तालुक्यांतून काँग्रेस व्होटिंग होण्याची शक्यता मतदानापूर्वीच वर्तविण्यात येत होती. ती खरी ठरली असून राजकीय डावपेचातून काहींचा करेक्ट कार्यक्रम होता होता वाचल्याचे दिसून येत आहे. मात्र, अवघ्या १६ मतांनी पराभव झाल्याची रुखरुख साठे यांना लागून राहणार आहे. (Dudh Pandhari election: Vaishali Sathe defeated by 16 votes)

दूध पंढरीच्या १६ जागांसाठी बाळे येथील चंडक प्रशालेत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी मंडळींनी जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न चालवले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. सत्ताधारी मंडळी शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होती, तर विरोधात जिल्हा दूध संघ बचाव कृती समिती ११ उमेदवारांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरली होती. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे यांच्या सूनबाईंना सत्ताधारी पॅनेलकडून उमेदवारी मिळू शकली नव्हती, त्यामुळे त्यांनी विरोधातील कृती समितीकडून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता.

 Vaishali Sathe-Baliram Sathe
दिशा सॅलियन प्रकरणात मोठा खुलासा; नारायण राणेंसह नितेश यांच्यावरही गुन्हा दाखल

साठे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत काहीशी चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी प्रचारात सत्ताधारी मंडळींवर कठोर शब्दांत टीका केली होती. तसेच, जिल्ह्यातील काही मतदारसंघातील मताची आणि बेरजेच्या राजकारणची गणिते पाहता क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, त्यानुसार काही तालुक्यातून क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येत आहे. वैशाली साठे यांनी महिला मतदार संघातून निर्मला काकडे यांना कडवी झुंज दिली. मात्र, विजयापर्यंत पोचण्यात वैशाली साठे यांना अपयश आले आहे. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांनी सहकार्य केले.

 Vaishali Sathe-Baliram Sathe
प्रगती हवी, तर विकास करणाऱ्याच्या पाठिशी राहावे लागेल!

उमेदवारनिहाय मते

मतदार संघ : क्रियाशील संस्था

झालेले मतदान : ३१२

वैध मते : २९१

अवैध मते : २१

अनिल अवताडे ९०, बबनराव आवताडे १८९, सुवर्णा इंगळे ८८, मनोज गरड १८९, कांचन घाडगे ८४, अलका चौगुले २०२, भाऊसाहेब धावणे ८८, पार्वतीबाई पाटील ७९, सारिका पाटील १०, संजय पोतदार ८१, बाळासाहेब माळी २२७, राजेंद्र मोरे २११, संभाजी मोरे २१४, विजय येलपले २११, मारुती लवटे २२६, औदुंबर वाडदेकर २१८, रणजितसिंह शिंदे २०७, सुनीता शिंदे ८४, वैशाली शेंबडे १९९, योगेश सोपल २०१.

महिला प्रतिनिधी

एकूण मते : ३१३

वैध मते : २९९

अवैध : १४

निर्मला काकडे १६०, छाया ढेकणे २०६, सारिका पाटील ४, सरस्वती भोसले २, संगीता लोंढे ६७, सुनीता शिंदे ७, वैशाली साठे १४४.

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघ

एकूण मते : ३१३

वैध मते : ३०८

अवैध मते : ५

जयंत साळे २२८, मंगल केंगार ८०

भटक्‍या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ

एकूण मते : ३१३

वैध मते : ३०९

अवैध मते : ४

रमजान नदाफ ७४, राजेंद्रसिंह पाटील २३५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com