मोहिते पाटलांची साथ सोडून शिंदेंच्या गोटात सामील होऊनही उमेदवारीत डावलले :समर्थकांचा आमदारांवर रोष

दूध पंढरी निवडणूक : विद्यमान संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांना उमेदवारी नाकारली
Rajendrasinh Rajebhosle
Rajendrasinh Rajebhoslesarkarnama

करमाळा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्हा दूध संघाचे (Dudh Pandhari) सलग पाच टर्म संचालक असलेले वीटचे राजेंद्रसिंह राजेभोसले यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीत डावलण्यात आले आहे. राजेभोसले यांच्यासाठी हा मोठा धक्का असून हा सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. या निर्णयामुळे राजेभोसले समर्थक दूध संघाच्या मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे राजेभोसले हे आमदार संजय शिंदे (sanjay shinde) यांचे समर्थक आहेत. आमदार संजय शिंदे यांनी राजेभोसले यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे राजेभोसले समर्थक उघडपणे बोलत आहेत. (Dudh Pandhari Election : Director Rajendrasinh Rajebhosle's candidature rejected)

जिल्हा दूध संघासाठी महाविकास आघाडीतर्फे करमाळ्यातून आमदार शिंदे समर्थक केत्तूरचे राजेंद्रसिंह उर्फ अशोक पाटील आणि बागल निष्ठावंत अलका चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विद्यमान संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांची उमेदवारी निश्चित समजली जात असतानाच त्यांचा पत्ता ऐनवेळी कट करणयात आला आहे.

Rajendrasinh Rajebhosle
'गणेश नाईकांवर टीका करण्याची संधी मंदा म्हात्रेनी सोडली नाही'

करमाळा तालुक्यातील वीट येथे दूध संस्थेची स्थापना करून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणारे राजेंद्रसिंह राजेभोसले हे 1992 मध्ये प्रथम जिल्हा दूध संघाचे संचालक झाले. तेव्हापासून 2021 पर्यंत ते संचालक होते. राजेंद्रसिंह राजेभोसले यांची ओळख सुरुवातीपासूनच मोहिते पाटील समर्थक म्हणून होती. ते मोहिते पाटलांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते. मोहिते-पाटील समर्थक म्हणून काम करताना ते तालुक्यात कायम बागल गटाबरोबर राहिले होते. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. मोहिते पाटील यांना राजेभोसले यांनी सोडचिठ्ठी देणे, हे आश्चर्यकारक होते. राजेभोसले हे 2014 पासून आमदार शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांच्या राजकीय कारकीर्द असलेल्या दूध संघातून त्यांना डावलण्यात आलेले आहे.

Rajendrasinh Rajebhosle
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या सूनबाई महाआघाडीच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात!

दरम्यान करमाळा तालुक्यातील ३९ मतदारांपैकी २८ मतदारांचे राजेभोसले यांना समर्थन होते. आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत करमाळा येथील बैठकीत त्यांनी या मतदारांच्या उपस्थितीत बैठकही घेतली होती. मात्र, ती ओळखपरेड राजेभोसले यांना उमेदवारी मिळवून देऊ शकली नाही.

Rajendrasinh Rajebhosle
सरपंचांनी सोमय्यांना पाडलं तोंडावर; दावा केलेल्या जागेचं सांगितलं वास्तव

संघाच्या निवडणुकीत श्रेष्ठींची भूमिका निभावणारे माजी आमदार दिलीप सोपल यांनी आज उमेदवारांची यादी वाचून दाखवली. त्या उमेदवारांच्या यादीत आपले नाव नाही हे लक्षात येताच राजेंद्रसिंह राजेभासले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच, त्यांचे चिरंजीव अभयसिंह राजेभोसले यांनीही भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Rajendrasinh Rajebhosle
वाढदिवशीच जयंत पाटलांवर आबांना खांदा देण्याची वेळ आली होती..

माझ्या पाठिशी मतदार असतानादेखील आज माझी उमेदवारी डावलली आहे. मतदार पाठीशी असूनही उमेदवारी डावलण्यात येते असेल तर हा कुठला न्याय आहे. करमाळा तालुक्यातील ३९ मतदारांपैकी २८ मतदारांचा मला उघडपणे पाठिंबा होता. आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत 28 मतदारांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली होती, असे असतानाही मला डावलण्यात आले आहे. कमी मतदारांचा पाठिंबा असणाऱ्यांना उमेदवारी मिळाली. पण, मला डावलण्यात आले. करमाळा तालुक्यातील गावागावांत सोलापूर जिल्हा दूध संघाची दूध डेअरी काढली. येथील शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून दिला. आजपर्यंत जिल्हा दूध संघात अतिशय प्रामाणिकपणे काम केले. गेल्या 28 वर्षे केलेल्या कामावर मी समाधानी आहे, असे राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी उमेदवारी कापण्यात आल्यानंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com