Solapur NCP News : राष्ट्रवादी नेत्याच्या अंगावर ट्रक घालणारा चालक म्हणतो ‘तो मी नव्हे’च!

आपल्याला या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना शिष्टमंडळ घेऊन भेटणार असल्याचे रमेश बारसकर सांगितले.
Ramesh Baraskar
Ramesh BaraskarSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश चिटणीस तथा राज्य ओबीसी आघाडीचे समन्वयक रमेश बारसकर यांच्या गाडीच्या अपघात प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. संबंधित ट्रकचालकाने ‘तो मी नव्हे’ची भूमिका घेतल्याने खरा चालक कोण असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Driver who hit the NCP leader with a truck says 'It's not me'!)

दरम्यान, आपल्याला या प्रकरणी योग्य न्याय मिळावा, यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी उपसभापती मानाजी माने यांच्यासह अन्य शिष्टमंडळ घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडणार आहे, अशी माहिती बारसकर यांनी दिली.

Ramesh Baraskar
Janata Dal News : राजकारण तापलं : देवेगौडांच्या पक्षातील नेत्याची आमदारकी रद्द

या संदर्भात माहिती अशी की, रमेश बारसकर व त्यांचे स्वीय सहायक शीलवंत क्षीरसागर हे सोमवारी (ता. २७ मार्च) सोलापुरातून त्यांची कामे आटोपून मोहोळकडे येत होते. बारसकर यांची गाडी दुपारी चारच्या सुमारास सावळेश्वर टोल नाक्यावर आल्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागून कर्नाटक राज्याची नोंदणी असलेला एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि बारसकर यांच्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला.

बारसकर यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडी बाजूला थांबविली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टाळला. त्यावेळी हा प्रकार पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी धावत आले त्यांनी चालकाला ट्रकच्या खाली उतरवून त्याचे नाव विचारले असता त्याने शांतलिंगेश्वर बाबुराव ढाले (रा. नांदगाव) असे उत्तर दिले होते.

Ramesh Baraskar
Karnataka Assembly Election : कर्नाटकातील भाजप आमदारांना ‘गुजरात मॉडेल’ची चिंता : कुणाचा पत्ता कट होणार.... कुणाला लॉटरी लागणार?

दरम्यान, बारसकर यांची मोहोळच्या नगराध्यक्षपदी निवड होताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. विविध राजकीय पक्षांचा रोष पत्करून ते पदावर विराजमान झाले होते. तसेच, येत्या काही दिवसांत मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे, त्यामुळे माझ्या अपघाताचा बनाव करून घातपात करण्याचा प्रयत्न असल्याची लेखी तक्रार बारसकर यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी ट्रकचालकाला आणि त्याचा सहकारी महादेव विलास सुरवसे यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान ट्रकमध्ये आंबा फळासह विविध रोपे असल्याने चालकाचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे तपासून पोलीसांनी ढाले याला सोडून दिले.

Ramesh Baraskar
Ajit Pawar On Supreme Court : ...हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सत्ताधाऱ्यांना राग यायचा : अजित पवारांनी खडसावले

दरम्यान या बाबत विविध वृत्तपत्रात बातम्या आल्याने त्या वाचून खऱ्या शांत लिंगेश्वर ढाले याने बारसकर व मोहोळ पोलिसाकडे धाव घेऊन ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका घेतली. त्यामुळे या प्रकरणाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ट्रकचा खरा चालक कोण, याचा तपास करून योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी संभ्रम निर्माण झाला आहे.

कॉल डिटेल्स तपासणे बाकी

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन माने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, टोल नाक्यावरील सोमवारचे सीसीटीव्ही फुटेज काढले आहे. तसेच, चालकाचे सीडीआर व कॉल डिटेल्स काढले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रथम दर्शनी तरी घातपाताचा प्रकार वाटत नाही. मात्र, अद्याप कॉल डिटेल्स तपासावयाचे आहेत, त्यानंतरच खरे काय व खोटे काय ते तपासात निष्पन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com