Elections : नाट्यमय घडामोडी घडणार? शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

Teacher and Graduate Constituency Elections : कोण-अर्ज मागे घेणार? कोण अर्ज कायम ठेवणार? हे सर्व गणित आज स्पष्ट होणार
Voting For Legislative Council Election
Voting For Legislative Council Election Sarkarnama

Nagpur Teacher and Nashik Graduate Constituency Elections : राज्यात सध्या विधान परिषदेच्या नाशिक, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ आणि औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.

आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधरचा मतदारसंघ सर्वात चर्चेत आहे. कारण येथे भाजपने त्यांचा अधिकृत उमेदवार कोणता याबाबत अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.

Voting For Legislative Council Election
Gulabrao Patil : 'ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही'

तसेच काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती. पण त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

Voting For Legislative Council Election
Nitin Gadkari News : गडकरींनी धमकी देणाऱ्या गुंडाची ती डायरी पोलिसांच्या हाती ; आणखी काही जणांना धमकीचे फोन..

आज आता अर्ज माघे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण-कोण अर्ज मागे घेणार? कोण अर्ज कायम ठेवणार? हे सर्व गणित स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नाशिक, अमरावती विभाग पदवीधर, आणि औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक या सर्वच मतदारसंघात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Voting For Legislative Council Election
Amit Shah : 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचं मोठं विधान, म्हणाले...

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने एबी फॉर्म देऊन देखील उमेदवारी अर्ज न भरल्याने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. तर काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असं स्पष्ट मत निलंबनाच्या कारवाईवर डॉ. तांबे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता सुधीर तांबे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in