कर्जतमध्ये पुन्हा नाट्य : भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा

कर्जतची निवडणूक भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
Ram Shinde, Rohit Pawar

Ram Shinde, Rohit Pawar

Sarkarnama

अहमदनगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी मोठी सभा आज कर्जतमध्ये झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला आणखी एक मोठा धक्का देत भाजपला खिड्डार पाडले आहे. भाजपचे प्रभाग 14मधील उमेदवार शिबा तारिक सय्यद यांनी अचानक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राम शिंदे यांचे धाबे दणाणले आहेत. Drama again in Karjat: BJP's official candidate supports NCP

कर्जत नगर पंचायत निवडणुकीत दररोज एक नाट्यपूर्ण घटना घडत आहे. राष्ट्रवादी दडपशाही करत असल्याचा आरोप भाजप निवडणूक जाहीर झाल्यापासून करत आहे. अशातच आज आणखी नाट्यपूर्ण घटना कर्जतमध्ये घडली. आज सायंकाळी चार वाजता भाजपने प्रचार सभा घेतली. या सभेत राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची दमदार भाषणे झाली. यात शिंदे व विखे यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र या सभेनंतर फाळके पेट्रोल पंपा जवळ राष्ट्रवादीची सभा झाली. या सभेत भाजपच्या प्रभाग 14मधील उमेदवार शिबा सय्यद दिसून आल्या.

<div class="paragraphs"><p>Ram Shinde, Rohit Pawar</p></div>
सुजय विखे पाटलांनी रोहित पवार, नीलेश लंकेंना मारला टोमणा, म्हणाले...

शिबा सय्यद दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सय्यद यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे तर भाजपचे कार्यकर्ते चिंते आहेत. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या दबाव तंत्राचा हा भाग असल्याची सांगत आहेत. भाजपने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते.

<div class="paragraphs"><p>Ram Shinde, Rohit Pawar</p></div>
राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

या प्रकारामुळे कर्जतच्या 13 प्रभागांपैकी तीन प्रभाग राष्ट्रवादीने मतदानापूर्वीच खिशात टाकल्याची चर्चा कर्जत शहरात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या पवार खेळीमुळे राम शिंदे यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com