डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सामान्यांची काळजी करा, तुरुंगात गेलेल्यांची नको...

भाजपचे ( BJP ) खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आज मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
MP Dr. Sujay Vikhe Patil
MP Dr. Sujay Vikhe PatilParesh Kapse

टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : देशात सध्या आर्यन खान प्रकरणावरून महाविकास आघाडी नेते व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज मंत्री नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. Dr. Sujay Vikhe Patil said, take care of common people, not those who have gone to jail...

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत पारनेर तालुक्यातील डिकसळ ते जामगाव रस्ता, जामगाव ते दैठणे गुंजाळ रस्ता,धोत्रे बृ येथे सभामंडप यासंह अन्य कामांसाठी 7 कोटी 53 लाख रूपयांचा निधी मंजुर झालेला आहे. या कामांचा प्रारंभ खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, विकास रोहकले, वसंत चेडे, सरपंच बंटी गुंजाळ आदी उपस्थित होते.

MP Dr. Sujay Vikhe Patil
खासदार विखे पाटील - आमदार लंके यांच्यातील वाकयुद्धाला झालर कशाची?

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईचे काय झाले? राज्यभरात रस्त्यावर खड्डे पडले आहेत यावर कोणी बोलणार आहे का ? यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न सोडुन महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रवक्ते अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. सामान्यांची काळजी करा. तुरूंगात गेलेल्यांची नको अशी टीका खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता केली.

खासदार डॉ. विखे पुढे म्हणाले, मी कामांमध्ये टक्केवारी न घेणारा लोकप्रतिनिधी आहे. विकासकामे सुरू असताना नागरिक व पदधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष द्यावे. ती दर्जेदार व्हावी कामांमध्ये कोणतीही तडजोड करू नये. निधी उपलब्ध करणे माझे काम आहे. त्यानंतर तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

MP Dr. Sujay Vikhe Patil
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

विजय औटींची केली स्तुती

पारनेर तालुक्यातील विकासकामांचे श्रेय देताना खासदार विखे पाटलांनी माजी आमदार नंदकुमार झावरे व विजय औटी यांना त्याचे श्रेय दिले. ते म्हणाले, पारनेर तालुका उभा राहताना नंदकुमार झावरे, स्वर्गीय वसंतराव झावरे, विजय औटी या सर्वांचे योगदान आहे. विकासकामांमध्ये औटी कमी पडले नाही. योजनेचा अभ्यास करून त्यांनी तालुक्यात निधी आणला. सत्तांतर करणे फार सोपे असते मतदान टाकताना कोणाला निवडून आणता त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघावर कसा होतो ते ही पाहिले पाहिजे, असे सांगत खासदार विखे पाटलांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com