डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दारात शिवसेना खासदारांना वडापाव खाण्याची वेळ

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी मुंबईतील दोन दिवसांपासूनच्या घडामोडीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व शिवसेनेवर टीका केली.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Paresh Kapse

टाकळी ढोकेश्वर ( जि. अहमदनगर ) - पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ( ता. पारनेर ) येथे खासदार डॉ.सुजय विखे पाटील विचारमंच आयोजित बैलगाडा शर्यत उद्घाटन, नारायणगव्हाण येथील सेवा संस्थेस भेट, मावळेवाडी, निघोज येथे विविध कार्यक्रम खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांची बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी मुंबईतील दोन दिवसांपासूनच्या घडामोडीवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व शिवसेनेवर टीका केली. ( Dr. Sujay Vikhe Patil said, it is time for Shiv Sena MPs to eat Vadapav at the door of the Chief Minister )

राळेगण थेरपाळ येथील कार्यक्रमांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, युवा नेते राहुल शिंदे पाटील, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सरपंच पंकज कारखिले, कैलास कोठावळे, सचिन वराळ पाटील, सरपंच मनोज मुंगसे, दादाभाऊ वारे, रवींद्र पाडळकर, किरण कोकाटे आदी उपस्थित होते.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील म्हणाले, जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम होईल...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, मातोश्री निवासस्थानावर महिला खासदार येणार म्हणून मुख्यमंत्री घरात बसून आहेत. यामुळे त्यांच्या पक्षाच्या खासदारांना मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या दारात बसून वडापाव खाण्याची वेळ आली आहे. राज्यात सरकारची गोंधळलेली स्थिती असल्याची टीकाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

डॉ. विखे पुढे म्हणाले की, वयोश्री योजनेचा दिल्लीत गाजावाजा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही योजना अहमदनगर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविल्याबद्दल कौतुक केले एखादी योजना राबविण्यात येत असताना त्याचा गावातील सर्वांनी लाभ घेणे आवश्यक असते अजूनही केंद्रातील योजना गावोगाव राबविणार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.

Dr. Sujay Vikhe Patil
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

नगरपंचायतमधील झालेला प्रकार निंदनीय - डॉ.विखे

पारनेर हा शिक्षक आणि अधिकारी पुरविणारा सुसंस्कृत तालुका अशी ओळख राज्यभर आहे मात्र पारनेर नगरपंचायत मध्ये अभियंत्यांला झालेली मारहाण त्या दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला देखील जुमानले नाही. हा झालेला प्रकार निंदनीय आहे. तालुका कोणत्या दिशेने चालला आहे, असा सवाल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com