डॉ. अजित नवले म्हणाले, वीज जोडणी तोडण्यासाठी येणाऱ्यांना खोऱ्याचा दांडा काढा...

महावितरण ( Mahavitaran ) प्रशासनाकडून शेतकऱ्याकडून सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे.
Dr. Ajit Nawale
Dr. Ajit NawaleShantaram Kale

अकोले ( अहमदनगर ) : महावितरण प्रशासनाकडून शेतकऱ्याकडून सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे. ही मोहीम तातडीने थांबवा या मागणीसाठी काल ( बुधवारी ) कोतुळ (ता. अकोले) येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी महावितरण प्रशासनावर जोरदार टीका केली. तसेच महावितरण कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

अकोले तालुक्यात थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याची मोहीम सुरू आहे. घरगुती व शेतीची वीज जोडणी तोडण्याची मोहीम ताबडतोब थांबवा. शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिल माफ करा, घरगुती वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्या अशा मागण्यांसाठी कोतुळ येथे हे आंदोलन करण्यात आले होते.

Dr. Ajit Nawale
डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा कोण?

डॉ. अजित नवले म्हणाले, सक्तीने वीजबिल वसुली करताना वीज जोडणी तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना खोऱ्याचा दांडा काढून हाकलून लावा. केंद्राने सोयाबीनचे दर पाडल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत आली आहे. अकरा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळावा अशी मागणी डॉ. नवले यांनी केली.

डॉ. नवले यांनी अगस्ती कारखान्याच्या कामकाजावर कोरडे ओढत त्यांनी कारखान्याच्या बाबतीत बी. जे. देशमुख यांनी मांडलेल्या अगस्ती कारखाना बचावच्या  भूमिकेचे समर्थन केले. तालुक्यात ज्याप्रमाणे मीटर हटाव पाणीवाटपाचा लढा तालुक्यात झाला त्या प्रमाणे वीज बिल माफीचा राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.

Dr. Ajit Nawale
अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टोमॅटोचा चिखल - अजित नवले

यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अमित भांगरे म्हणाले की वीज माफी व वीज जोडणी तोडण्यासंबंधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज राज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शासन स्तरावर पाठपुरावा करू असे सांगितले

Dr. Ajit Nawale
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

सुकाणू समितीचे नेते बी. जे. देशमुख यावेळी म्हणाले की उद्योगपतींचे कर्जमाफीसाठी अडीच लाख कोटी रुपये उधळले मात्र शेतकऱ्यांच्या 73 हजार कोटी कर्जमाफीसाठी आढे वेढे घेणे ही दुर्दैवी बाब आहे. दोन वर्षांपासून शेतकरी घरात आहे. कोरोना काळात शेतकरी अडचणीत असल्याने शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे, अशा अडचणीच्या काळात अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडल्यास घाटघर जलविद्युत प्रकल्पाची वीज बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा बी. जे. देशमुख यांनी दिला.

यावेळी जेष्ठ नेते दशरथ सावंत, राजेंद्र देशमुख ,निलेश तळेकर, कॉम्रेड सदाशिव साबळे आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com