Khatav : खोकेवाल्यांकडून औंधच्या विकासाची चिंता नको....गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी

koregaon कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी केलेल्या टीकेला गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सडेतोड उत्तर दिले
Mahesh Shinde, Gayatridevi Pantpratinidhi
Mahesh Shinde, Gayatridevi Pantpratinidhisarkarnama

Aundh News : ज्यांची राजकीय सुरवात आमचे बोट धरून झाली आहे. मात्र, स्वत: च्या राजकीय स्वार्थासाठी एका महिलेवर आरोप करून कोरेगावच्या Koregaon आमदारांचा प्रसिध्दीसाठी खटाटोप सुरू आहे. खोकेवाल्यांनी औंधच्या विकासाची चिंता करू नये. औंधच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी Gayatridevi Pantpratinidhi यांनी दिली.

औंध येथे विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, सदाशिव पवार, शंकरराव खैरमोडे, वसंत जानकर, चेअरमन उध्दव माने, संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गायत्रीदेवी म्हणाल्या,‘‘ मी नेहमीच समाजाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कधीच सूडबुद्धीने राजकारण केले नाही. परंतु, अपघाताने झालेल्या कोरेगावच्या आमदारांना औंधच्या झालेल्या विकासामुळे पोटशूळ उठला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात औंध संस्थानवर प्रेम करणारी अनेक गावे आहेत.

Mahesh Shinde, Gayatridevi Pantpratinidhi
गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी पुन्हा सक्रिय होणार; या पदांवर संधी  

लोकांची दिशाभूल करुन आपली राजकिय पोळी भाजणाऱ्या प्रवृतीला आता पुढील काळात जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.’’ तुमच्या मतदारसंघाची तुम्ही काळजी करा. आमच्या विकासकामात लुडबूड करु नका, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी औंध परीसर आणि औंध गावात सुरू असलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. कामे दर्जेदार करण्यासाठी संबंधितांना सुचना दिल्या.

Mahesh Shinde, Gayatridevi Pantpratinidhi
Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com