Phaltan : सत्तांतराची स्वप्ने बघू नका; इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच : रामराजे

Ramraje Naik Nimbalkar फलटण येथील शुक्रवार पेठ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

Phaltan News : दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघु नयेत. जोवर जनता आमच्या पाठीशी आहे, तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, की इथे सत्तांतर होईल. कोणाला कुणाची कितीही नावे घेऊ द्या. कितीही नेते आणुद्यात इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार. बाकी कुणाच इथं चालु शकणार नाही, असा इशारा आमदार रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी दिला.

फलटण येथील शुक्रवार पेठ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, शुक्रवार पेठ तालिम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘‘ खासदारकीच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी मिळाली होती. फलटण शहर व तालुक्याचे त्यांनी सोने करायला हव होते. परंतू, बोलण्यापलिकडे त्यांनी काही केले नाही व करुही शकत नाहीत. आता निवडणूका जवळ आल्यात त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने सगळेजण खच्चून ओरडू लागले आहेत. ते माझ्या दृष्टीने क्षूद्र आहेत.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : शरद पवारांच्या सहकार्यामुळेच नीरा देवघर प्रकल्प पूर्णत्वाला : रामराजे

त्यांच्यामध्ये क्षमता नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल लोक काय बोलतात हे आपणास चांगल माहिती आहे. त्यामुळे दांडगी हौस, राक्षसी महात्वकांक्षा व काम करण्याची ताकद व इच्छा नसणाऱ्यांसोबत जाऊन जनतेला चालणार नाही.’’

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan : नीरा नदी कुठे आहे... भाटघर धरण कुठल्या नदीवर आहे, हे खासदारांनी सांगावे...

नीरा-देवघर प्रकल्पाबाबत ते म्हणाले,‘‘ या प्रकल्पाचे आपणच सगळे केले आहे. मीच त्याचे भूमीपूजन केले, टेंडर काढले, ६६ किलोमीटर पाणी आणले. आता कालवे काढायला जमिनीच्या किंमती वाढल्याने पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. त्याचे टेंडरही झाले असेल. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील असतानाच हा निर्णय झाला आहे. कष्ट माझे आणि आयत्या पिठावर यांच्या रेघोट्या आहेत.’’

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara : श्रीनिवास पाटील : संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे खासदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com