कोरोनाला घाबरू नका : साताऱ्यात ५१ टक्के युवकांचे लसीकरण पूर्ण

सातारा Satara जिल्ह्यात कोरोनाचे Corona १३०० रूग्ण असून यापैकी चार जण व्हेंटिलेटरवर असून ३० जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकुणच ऑक्सिजन Oxygen व आयसीयुच्या ICU वापराचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी लोकांनी पॅनिक होऊ नये.
Shekhar Singh, collector satara
Shekhar Singh, collector satarasarkarnama

सातारा : ऑक्सिजन व आयसीयुचे प्रमाण कमी असले तरी लोकांनी पॅनिक न होता कोरोनाच्या लसीकरणावर भर द्यावा. १५ ते १८ वयोगटातील युवकांचे लसीकरण सध्या सुरू असून मागील चार दिवसात ५१ टक्के युवकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच दुसरा डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

नियोजन समितीच्या बैठकीनंतर शेखर सिंह यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे १३०० रूग्ण असून यापैकी चार जण व्हेंटिलेटरवर असून ३० जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकुणच ऑक्सिजन व आयसीयुच्या वापराचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी लोकांनी पॅनिक होऊ नये. लोकांनी लसीकरणावर भर द्यावा. विशेष म्हणजे युवकांसाठी लसीकरण मोहिम सुरू आहे. मागील चार दिवसांत आपण ५१ टक्के युवकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित युवकांनीही लसीकरण करून घ्यावे.

Shekhar Singh, collector satara
सातारा झेडपीचे सीईओ गौडा दांपत्याला कोरोनाची लागण

ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, यामध्ये ९५ टक्के लोक हे लस न घेतलेले आहेत. त्यामुळे लोकांनी लसीकरणावर भर द्यावा. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांनीही लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा, तसेच ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यांनी बुस्टर डोससाठी नोंदणी करावी. महाबळेश्वर येथे लोक पर्यटनासाठी येत आहेत. त्यासाठी प्रशासनाची काय भूमिका राहणार आहे, शेखर सिंह म्हणाले, पर्यटनस्थळाबाबत लोकांची भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com