आमच्यावर अन्याय करा आम्ही एक मिनिटात पलटी मारू

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विखे गटाचे राजकारण कसे चालते यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilParesh Kapse

अहमदनगर - बेलवंडी बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विखे गटाचे राजकारण कसे चालते यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ( Do us injustice, we will turn around in a minute )

या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचे आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील म्हणाले, जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम होईल...

या कार्यक्रमात खासदार डॉ. विखे यांच्या वाहनात राहुल जगताप दिसले. त्यामुळे हा दोन नेत्यांचा एकत्रित प्रवास नवीन राजकीय समीकरणांना जन्म देणारा ठरेल का यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावर खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांना सांगितले की, कारखान्याबाबत चर्चा झाली. राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूश आहेत. जो तो आपापल्या पक्षात खूश आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगी डॉ. सुजय विखे म्हणाले, अण्णासाहेब शेलार यांचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोक आले आहेत. यात काँग्रेसचे कोणी आलेले नाही. काँग्रेस आता फार काही राहिलेले नाही. त्यामुळे ते आले नाही तरी काही हरकत नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता राजेंद्र नागवडे यांना टोला लगावला.

Dr. Sujay Vikhe Patil
Video: "वाईन विकली तर ते किराणा दुकान मी बंद करेल",डॉ. सुजय विखे पाटील

खासदार विखे पुढे म्हणाले की, मी खासदार होण्याआधी जिल्हा बँकेची निवडणूक पाहिली. यात कोणी कोणाच्या बसमध्ये येतो आणि कोणाला मतदान करतो याचा काही नेम नाही. अशा भागाचा मी खासदार आहे. जिल्ह्यात काहीही घडले तरी त्याला विखेंनाच जबाबदार धरले जाणे चुकीचे आहे. कुकडीला पाणी येत नाही, रस्ते होत नाहीत याला जबाबदार धरतात. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. आपण सांगूनही कोणी बोलायचे थांबणार नाही. जिल्हा बँकेतील संचालक असलेला आमचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. लोक म्हणतात, विखेंनी सांगितल्या शिवाय जाईल कसा. मला खरच माहिती नव्हतं. पेपरमध्ये फोटो आल्यावर कळालं, असा खुलासाही खासदार विखे यांनी अमोल राळेभात यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत दिला.

अण्णासाहेब शेलार यांनी बेलवंडी परिसरात रस्त्याची मागणी केली. रस्ता कसा करायचा केव्हा करायचा याची घोषणा योग्य वेळी करू. आता घोषणा केली तर लोक विसरून जातील. तुम्ही निवडणुकीला उभे तर रहा. पक्ष तर ठरवा, चिन्ह ठरवा. तुम्ही कोणते चिन्ह ठरवता त्या मापात मी निधी टाकेल. श्रीगोंदा तालुक्यातील विखे गटात केवळ अण्णासाहेब शेलार यांनाच चाकाची खुर्ची आहे. ते कुठेही फिरू शकतात, अशी कोपरखळीही खासदार विखे यांनी अण्णासाहेब शेलार यांना मारली.

Dr. Sujay Vikhe Patil
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सामान्यांची काळजी करा, तुरुंगात गेलेल्यांची नको...

माझ्या वडिलांच्या आमदार निधीतील अडीच कोटी रुपये महावितरणला दिले. त्यातून राहाता तालुक्यात जेथे रोहित्र जळाले असेल तेथे तातडीने नवीन रोहित्र त्यांनी बसविले. बबनराव पाचपुते यांनी अडीच कोटी रुपये निधी द्या मी एक कोटीचा निधी देतो. असा साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून श्रीगोंद्यातील जी रोहित्रे वारंवार जळत आहेत. ती नवीन करू. विजेचा प्रश्न सोडवू.

पक्ष राहतात. पक्ष जातात. ज्या पक्षासाठी मोदींच्या विरोधात पाथर्डीत रॅली केल्या तो पक्ष आम्हाला न्याय देऊ शकला का. नाही देऊ शकला. म्हणून आम्ही पलटी मारली. जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत. आमच्यावर अऩ्याय करा आम्ही एक मिनिटात पलटी मारू. कारण माणूस एका कुटुंबा विरोधात, एका वैचारिकते विरोधात आजीवन लढला म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढला म्हणून अऩ्याय व्हावा. हा अन्याय आम्हाला मान्य नाही. आमचा गट जिवंत ठेवतो. आमचे कार्यकर्ते जिवंत ठेवतो. ज्या दिवशी विखेंचे कार्यकर्ते संपतील त्या दिवशी शेतकऱ्यांना कोणीही वाली राहणार नाही. प्रस्थापितांविरोधात लढायचे असेल तर असे कार्यकर्ते लागतात जे स्वतःचा प्रपंच न पाहता सामान्य लोकांच्या प्रपंचासाठी लढत राहतात. हीच कै. बाळासाहेब विखे पाटील यांची शिकवण होती. त्याच विचाराने आम्ही अहमदनगर जिल्ह्यात राजकारण करत राहू. आरोप-प्रत्यारोप होत राहतील. आमचे कुणाशी वैर नाही. आम्ही कुणाला पाडले नाही आणि कुणाला निवडूनही दिले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल जगताप म्हणाले, सर्वसामान्यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम अण्णासाहेब शेलार यांनी केले. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका. कुणाला काय वाटते याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही प्रामाणिकपणाने काम केल्याने बेलवंडीची जनता तुमच्या पाठीमागे उभी राहिलं, असे जगताप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com