संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करु नका : सहकारमंत्र्यांची सूचना

मंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil म्हणाले, अतिरिक्त ऊसाचा Extra Sugarcane प्रश्न दर पाच-सहा वर्षांनी निर्माण होतो. कारण पट्टा पद्धत, ड्रिप पध्दतीमुळे ऊसाचे उत्पन्न वाढले आहे.
Balasaheb Patil
Balasaheb Patilsarkarnama

कऱ्हाड : महाराष्ट्रात यंदा ऊसाचे उत्पन्न वाढल्याने कारखान्यांपुढे गाळपाचे मोठे आव्हान आहे. गेल्या दोन वर्षात चांगला झालेला पाऊस, दुष्काळी भागात पोहोचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखान्यांनी गाळप थांबवू नये, अशी सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.

मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न दर पाच-सहा वर्षांनी निर्माण होतो. कारण पट्टा पद्धत, ड्रिप पध्दतीमुळे ऊसाचे उत्पन्न वाढले आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर आता उभा असलेला ऊस गाळपाचे मोठे आव्हान साखर कारखान्यांसमोर आहे. मी सध्या सर्व राज्यातील आढावा घेत असून संपूर्ण ऊस गाळप झाला पाहिजे, असे नियोजन सुरू आहे. चालूवर्षी हेक्टरी उत्पादनही वाढले आहे.

Balasaheb Patil
सातारा युवक काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदी अमरजित कांबळे, अमित जाधव कार्याध्यक्ष

यंदा बीड, जालना, परभणी या तीन मराठवाड्याच्या जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत. सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील सहकारी साखर कारखाना, प्रतापगड सहकारी कारखाना आणि खंडाळा कारखाना हे सुरू न झाल्याने तेथे ऊसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर आहे. त्यासाठी अजूबाजूच्या परिसरातील कारखान्यांना ऊस गाळपाच्या सूचना दिलेल्या आहेत.

Balasaheb Patil
शिवेंद्रसिंहराजेंचे प्रयत्न; सातबाऱ्यावरील हस्तांतर बंदीचे शेरे हटले...

सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जूना खानापूर या दुष्काळी भागात टेंभु-ताकारी योजनांचे पाणी गेल्याने ऊस वाढला आहे. तरीही जोपर्यंत उभ्या ऊसाचे संपूर्ण गाळप होत नाही, तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत अशा सूचना कारखान्यांना केलेल्या आहेत. साखर आयुक्तांकडुन मी स्वतः आढावा घेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com