Shrikant Deshmukh : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या देशमुखांना तूर्त दिलासा

हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
Shrikant Deshmukh
Shrikant Deshmukhsarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे सोलापूरमधील नेते श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. याप्रकरणी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी दिलासा मिळाला आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल (शनिवारी) सुनावणी झाली. श्रीकांत देशमुख यांना न्यायालयात हजर राहण्याबाबतच्या अर्जावर युक्तिवाद झाला.

पोलीस ठाण्यात देशमुखांनी तीन दिवस हजेरी लावली आहे, अॅड. मिलिंद थोबडे यांनी केलेला हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. सोमवारपर्यंत (ता.८) त्यांना अटक न करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दिले आहेत. कोर्टात हजर राहण्याचे नेमके कारण दिले नाही.त्यामुळे सरकार पक्षाने केलेला अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती अॅड. थोबडे यांनी केली होती.आता या जामीन अर्जावर सोमवारी (८ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

Shrikant Deshmukh
Shiv sena : कात्रजमध्ये पुन्हा शिंदे -ठाकरे गट आमने-सामने येणार ; उदय सामंतांचे आव्हान

देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

श्रीकांत देशमुख यांनी 2009, 2014 साली सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. देशमुख यांचं प्रकरण समोर आल्यानंतर साहजिकच राजकीय वर्तुळात तसंच सोशल मीडियावर खळबळ उडाली. विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात असताना बॅकफूटवर आलेल्या भाजपने अखेर देशमुखांचा राजीनामा घेऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

-----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com