युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांनी केलेल्या निवडीला जिल्हाध्यक्षांचे आव्हान

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी दोन दिवसांपूर्वीच श्रीरामपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह केल्या.
Youth Congress
Youth CongressSarkarnama

महेश माळवे

Youth Congress : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी दोन दिवसांपूर्वीच श्रीरामपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह दोघांच्या निवडी केल्या. या निवडी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी स्थगित केल्याने काँग्रेस अंतर्गत नवा वाद उफाळून आला आहे.

श्रीरामपुरात आमदार लहू कानडे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे असे काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले आहे. अधूनमधून या दोन्ही गटात वर्चस्ववादाची लढाई सुरू असते. दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रितेश चव्हाणके, उपाध्यक्षपदी शाहरुख शेख, सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी कुणाल पाटील व गोपाळ भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Youth Congress
राष्ट्रवादीचे 'एक बुथ दहा युथ' अभियान..!

महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या सहीने असलेली नियुक्तीपत्रे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी साई संस्थांचे विश्वस्त सचिन गुजर, करण ससाणे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा दिघे आदी उपस्थित होते.

या निवडीला आक्षेप नोंदविण्यात आला असून प्रदेश उपाध्यक्षांच्या पत्राने करण्यात आलेल्या नियुक्त्या जिल्हाध्यक्षांनी स्थगित केल्या आहेत. हे करत असताना जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी म्हटले आहे की, भारतीय युवक काँग्रेस ही संघटना देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये चालते. भारतीय युवक काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन पदाधिकारी निवड प्रक्रिया होते. पूर्ण देशभर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याच पद्धतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातात.

Youth Congress
Congress: युवक काँग्रेस हीच काँग्रेसची खरी ताकद

यादरम्यान श्रीरामपूर तालुका व शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी काँग्रेसच्या निवड प्रक्रियेप्रमाणे झालेल्या नसून, सदरील निवडी करण्याचा अधिकार जिल्हाध्यक्ष या नात्याने माझा असल्यामुळे मी श्रीरामपूर शहरातील झालेल्या पदाधिकारी निवडींना तात्काळ स्थगिती देत आहे. श्रीरामपूर तालुका व शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पुढील निवडी जाहीर करेपर्यंत श्रीरामपूर शहराध्यक्ष म्हणून अभिजीत लिपटे हेच काम पाहतील. तसेच इतर सर्व जुने पदाधिकारी भारतीय युवक काँग्रेसचे काम करत राहतील. जिल्हाध्यक्ष वाबळे यांनी काढलेल्या पत्रांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीरामपूर आतील हा वाद आता थेट जिल्हा व तिथून पुढे प्रदेशपर्यंत पोहोचला असल्याची चर्चा या निमित्ताने झडत आहे.

नियुक्त्या रद्द होणार नाही

महाराष्ट्र युवकच्या उपाध्यक्षांना अधिकार नाहीत आणि जिल्हाध्यक्षांना अधिकार आहेत का? महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र सिंग यांना विचारून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या पत्रावर उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारी वंदना बेन यांची स्वाक्षरी नसल्याने गैरसमज झाले होते. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नव्याने पत्र देण्यात येतील. जे जिल्हा, तालुका काँग्रेसचे प्रभारी आहेत तसेच महाराष्ट्रचे जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले त्यांनाच नियुक्तीचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे या नियुक्त्या कुठल्याही परिस्थितीत रद्द होणार नाही

- प्रशांत ओगले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in