शरद पवार सोडविणार जिल्हा बॅंकेचा तिढा; रविवारी सातारच्या दौऱ्यावर

शरद पवार आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती ठरविणार आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarfacebook

सातारा : जिल्हा बॅंकेसह आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना चार्ज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे येत्या रविवारी (ता. ३१) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अंतर्गत निर्माण झालेला तिढा सोडवून सर्वसमावेशक पॅनेल अंतिम करणार आहेत. तसेच आगामी निवडणुकांची रणनिती ही ठरविणार आहेत. त्यामुळे श्री. पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली. त्यानंतर कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने तब्बल दीड वर्षे लॉकडाउनमध्ये गेले. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याची गरज आहे. आगामी काळात होणाऱ्या पालिका, नगरपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसह सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पक्षासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पॅनेलचा तिढा सोडविण्यासाठी खासदार शरद पवार येत्या रविवार (ता. ३१) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Sharad Pawar
पुणे-पिंपरीत अजित पवारांना जमेना म्हणून शरद पवार लक्ष घालणार का ?

सकाळी नऊ वाजता त्यांचे साताऱ्यात विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदारांसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar
जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजेंकडून पराभवाचा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील बदला घेणार?

यावेळी शरद पवार आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती ठरविणार आहेत. श्री. पवार यांच्या या दौऱ्यातून कार्यकर्त्यांना चार्ज केले जाणार आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत निर्माण झालेला राष्ट्रवादी अतंर्गत नेत्यांचा नाराजीचा तिढाही ते सोडविणार आहेत. कदाचित सर्वसमावेशक पॅनेलचे अंतिम उमेदवारही तेच ठरवून जातील, त्यामुळे श्री. पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com