Akole Nilwande Dam : निळवंडे कार्यक्रमात गोंधळ; पाणी मिळत नसल्याने शिंदे-फडणवीसांसमोर शेतकरी आक्रमक!

Akole Nilwande Dam : कार्यक्रम धरणाच्या पाणी सोडण्याचं चाचपणी घेणारा होता, तर याच कार्यक्रमात पिण्यासाठी पाणी नाही...
Akole Nilwande Dam :
Akole Nilwande Dam :Sarkarnama

Ahmednagar News : निळवंडे प्रकल्पाचे (Nilwande Dam) काम अखेरीस पूर्ण दिले आहे. हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी महाराष्ट्रला तब्बल 53 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. निळवंडे प्रकल्पाच्या कालव्याचे काम ही पूर्ण झाले आहे. यामुळे अवर्षणग्रस्त भागाला हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्धाटन झाले. मात्र या कार्यक्रमादरम्यान पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, शेतकरी आक्रमक झालेले दिसून आले. या वेळी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला.

Akole Nilwande Dam :
NCP New President : राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वावर बोलण्यास जयंत पाटलांनी टाळलं ; म्हणाले, " मला बोलवण्याची पक्षाला गरज.."

हा कार्यक्रम दुपारी आयोजित केल्यामुळे ऊन्हामध्ये सुरक्षेच्या कारणासाठी शेतकऱ्यांना ऊन्हात पाण्याची बॉटल देण्यात न आल्याने, उपस्थित काही शेतकऱ्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. हा कार्यक्रम धरणाच्या पाणी सोडण्याची चाचपणी घेणारा होता, तर याच कार्यक्रमात पिण्यासाठी पाणी न दिल्याने, याची एकच चर्चा झाली.

Akole Nilwande Dam :
Ajit Pawar News: अजितदादांनी रोहित पवार-शिंदे वादावर बोलणं टाळलं; "यंदाच्या कार्यक्रमाबाबत मला.."

१२५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार :

दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 53 वर्षांचा कालावधी लागला, असे असले तरी आता या धरणामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तब्बल 68000 हेक्टर जमिनीचा सिंचन प्रश्न मिटणार आहे.

नाशिक ते अहमदनगर या दोन जिल्ह्यामधील 125 गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. यापुढे आता या धरणीातून पाणी वितरीत करण्यासाठी पाईपचे जाळे तयार करण्यात येणार आहे. यातून या गावात पाणी वितरीत होईल, पाईपचे जाळे तयार होण्यासाठी आणखी तीन वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com