Karad Market Committee : काँग्रेस, राष्ट्रवादीत बिघाडी,भाजपमध्ये फुट; कऱ्हाडला नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..

Balasaheb Patil आमदार बाळासाहेब पाटील यांना कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे नेते अतुल भोसले यांनी साथ कायम ठेवली आहे.
Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavan
Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavansarkarnama

Karad Market Committee : कऱ्हाड (जि.सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ८० अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बिघाडी झाली असुन तालुक्यातील भाजप नेत्यांतही फुट पडली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकरांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले Atul Bhosale यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे.

कऱ्हाडची बाजार समिती ही राज्यातील मोठी उलाढाल असणारी समिती आहे. त्या बाजार समितीची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी यासाठी यावेळच्या बाजार समितीच्या निवडणुकीची गणिते बदलणार असल्याचे संकेत गेल्या सहा महिन्यापुर्वीच मिळाले होते. त्यातच मध्यंतरी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडीवेळी जिल्हा बॅंकेबरोबरच बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या समिकरणांची बेरीज करण्यात आली होती.

बाजार उमेदवारी अर्ज दाखल कऱताना सोसायटी गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गातुन ३४, महिला प्रवर्गातुन ७, इतर मागास प्रवर्गातुन ७, विमुक्त जाती भटक्या जमातीमधुन ४, ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गातुन १२, अनुसुचीत जाती-जमाती प्रवर्गातुन ६, आर्थिक दुर्बल घटकातुन ५, व्यापारी-आडते गटातुन ४, हमाल-मापाडी गटातुन एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavan
Koregaon market committee : पक्षाअंतर्गत खो-खो, कबड्डीचा खेळ नको; रामराजे नाईक-निंबाळकर स्पष्टच बोलले

सातारा जिल्हा बॅंकेसाठी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील - उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी निवडणुक लढवली. त्यावेळी कऱ्हाड दक्षिणधील कॉंग्रेसचे विरोधक असलेले भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या गटाने आमदार पाटील यांना साथ दिली. त्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavan
Phaltan Market Committee : राजेगटासमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान; खासदार निंबाळकर यांची सावध भूमिका

कऱ्हाड दक्षिणध्ये भोसले गटाला कॉंग्रेसच्या नेत्यांशी जवळीक ठेवणे पक्षीय पातळीवर योग्य होणार नाही. त्याचा विचार करुन आमदार पाटील आणि भोसले गटाने यापुढच्या निवडणुकांसाठी जिल्हा बॅंकेचाच हाच पॅटर्न ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान आठवड्यापुर्वीच बाजार समितीच्या निवडणुक जाहीर झाली. या निवडणुकीत अॅड. उंडाळकर यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाची साथ आहे.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavan
Satara Market Committee : आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाविरोधात स्वाभिमानीसह सर्वपक्षीय एकवटले...

त्याचबरोबर त्यांना कऱ्हाड उत्तरमधील आमदार बाळासाहेब पाटील यांचे विरोधक भाजपचे मनोज घोरपडे, धैर्यशील कदम व अन्य पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याचे काल उमेदवारी अर्ज दाखल करताना स्पष्ट झाले. तर आमदार पाटील यांना कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे नेते अतुल भोसले यांनी साथ कायम ठेवली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील राजकारण बदलले असुन महाविकास आघाडीतील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बिघाडी तर भाजपमध्येही फुट पडल्याचे समोर आले आहे.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavan
Mumbai Metro News : मुंबई मेट्रो कार शेड विरोधात दाव्यावर 3.81 कोटी खर्च : मुंबई मेट्रोची माहिती!

त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत मोठी चुरस वाढली असुन निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकरांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे.

Balasaheb Patil, Atul Bhosale, Prithviraj Chavan
Jawali Market Committee News: जावली बाजार समितीत तीन आमदारांची प्रतिष्ठापणाला; १८ जागांसाठी १२१ अर्ज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com