Karad APMC Election: कराड बाजार समितीतील अभद्र युती उधळुन लावा : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Statement: कऱ्हाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. चव्हाण बोलत होते.
Prithviaraj Chavan, Atul Bhosale, Balasaheb Patil
Prithviaraj Chavan, Atul Bhosale, Balasaheb Patilsarkarnama

-हेमंत पवार

Karad Bazar Samiti News : कऱ्हाड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कऱ्हाड Karad बाजार समितीची सत्ता द्यायची का? असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी विरोधकांनी दुष्ट व अभद्र युती उधळून लावा, असे आवाहन त्यांनी मतदरांना केले.

कऱ्हाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लोकनेते कै. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या प्रचारार्थ विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. चव्हाण बोलत होते. पॅनेल प्रमुख अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, अविनाश मोहिते, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, एम. जी. थोरात, अर्चना पाटील, फरिदा इनामदार उपस्थित होत्या.

आमदार चव्हाण म्हणाले, बाजार समिती स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही संस्था निर्माण झाली. शामराव पाटील हे पहिल्यांदा सभापती झाले. त्यानंतर विलासकाकांनी बाजार समितीच्या प्रगतीसाठी घाम गाळला. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कऱ्हाडची बाजार समितीची सत्ता द्यायची का ? विरोधकांनी दुष्ट व अभद्र युती उधळून लावा. (Latest Maharashtra News)

Prithviaraj Chavan, Atul Bhosale, Balasaheb Patil
Karad APMC News : कराडला कॉंग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी-भाजप युती; पाटील, चव्हाण आमनेसामने

ॲड. उंडाळकर म्हणाले, विलासकाकांनी अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना सत्तेत स्थान दिले. हे करत असताना काही प्रस्थापित मंडळी घुसली आणि तीच मंडळी आपल्यासमोर लोकशाहीला बगल देवून मतदारांवर दबाव आणत आहेत. प्रस्थापित मंडळींना सत्तेसाठी व काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे.

प्रस्थापित आणि सरंजामदार हे सूत्र बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. सर्वसामान्य लोकांना गुलाम बनवण्याच्या विचारातून ही मंडळी कार्यरत आहेत. त्यातून समाजाला वाचवण्यासाठी लढा उभा केला पाहिजे. या भूमिकेतून वाटचाल सुरू आहे. विलासकाकांनी संघर्ष केला. तो संघर्ष घेवून मी पुढे चाललो आहे. तुम्ही या संघर्षात या. बाजार समितीचा गुलाल हा तुमचाच आहे, असेही उंडाळकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com