ठाकरे-शिंदे गटात गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्थानावरून वाद

राज्यातील नेतृत्वावरून शिवसेनेत दोन गट पडले. त्याचे लोण राज्यभर पसरले.
Shivsena
Shivsena Sarkarnama

Shivsena : राज्यातील नेतृत्वावरून शिवसेनेत दोन गट पडले. त्याचे लोण राज्यभर पसरले. नगरमध्येही त्याचा प्रभाव दिसू लागला आहे. अगदी गणेश मंडळाच्या नेतानिवडीवरूनही वर्चस्वाची लढाई सुरू आहे. शिवसेनेचा चेहरा समजल्या जाणाऱ्या नगर शहरातील शिवसेनेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवरही शिंदे गटाने दावा सांगितला आहे. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत ग्रामदैवत विशाल गणपतीसह 12 मंडळांचा समावेश आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीतील चौदाव्या स्थानावर ठाकरे आणि शिंदे गटाने दावा केला आहे. हे स्थान नेमके कुणाचे, याचा तिढा थेट पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या कोर्टात पोचला आहे. मंडळांच्या क्रमांकांसाठी सोडत काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, मानाच्या गणेश मंडळांनी विरोध केल्याने तो मागे घेण्यात आला.

Shivsena
नगर राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर : पक्ष वाढीसाठी जोर-बैठका

या मानाच्या गणपती मंडळांनंतर अन्य गणेश मंडळांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. 13 व्या क्रमांकावर आनंद युवक मंडळाचा गणपती असतो, तर 14 व्या क्रमांकावर शिवसेनेचा गणपती असतो. तशी परंपरा आहे. शिवसेनेच्या मंडळाची परवानगी शिवसेना शहरप्रमुख पोलिसांकडून घेतात. मात्र, राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्याने, 14 व्या क्रमांकाचा शिवसेनेचा गणपती कोणत्या गटाचा असणार, असा तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून शहरप्रमुख संभाजी कदम, तर शिंदे गटाकडून शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी परवानगी मागितली आहे. यावर काय तो निर्णय पोलिस अधीक्षक ऐन वेळी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Shivsena
नगरचे शिवसेना नगरसेवक गेले मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला : म्हणाले हेच आमचे गुरू

परंपरेप्रमाणे मानाच्या गणपतींनंतर शिवसेनेचा गणपती मिरवणुकीत 14 व्या क्रमांकावर असतो. त्यासाठी आम्ही पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे. आम्ही उत्साहात मिरवणूक काढणार.

- संभाजी कदम, शहरप्रमुख (ठाकरे गट)

पोलिसांनी बोलाविलेल्या मंडळांच्या बैठकीला आम्ही नव्हतो. त्यामुळे तेथे काय झाले माहिती नाही. मात्र, मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आम्ही परवानगी मागितलेली आहे.

- दिलीप सातपुते, शहरप्रमुख (शिंदे गट)

जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त

अपर पोलिस अधीक्षक - 2

पोलिस उपअधीक्षक - 7

पोलिस निरीक्षक - 35

सहायक पोलिस निरीक्षक - 47

पोलिस उपनिरीक्षक - 68

इतर पोलिस कर्मचारी - 3,045

होमगार्ड - 1200

मानाची गणेश मंडळे

1) विशाल गणपती, 2) संगम, 3) माळीवाडा, 4) आदिनाथ, 5) दोस्ती, 6) नवजवान, 7) महालक्ष्मी, 8) कपिलेश्‍वर, 9) नवरत्न, 10) समझोता, 11) नीलकमल, 12) शिवशंकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com