डिसलेंनी शाळेचा पासवर्ड वापरून काढला पगार ; चौकशी समितीकडून नियमभंगाचा ठपका

रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी सरकारी पद्धतीने आवश्यक तेथे परवानगी न घेता कामकाज केले.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh DisaleSarkarnama

सोलापूर : विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या साहाय्याने शिकवण्याचे तंत्रज्ञान रणजितसिंह डिसले (disle guruji) यांनी राज्यात सर्वप्रथम लागू केले, मात्र, आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेल्या या गुरुजींनी कंटाळून राजीनामा दिला आहे. (disle guruji news update)

जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने डिसले गुरुजीबाबतचा अहवाल दिला आहे. यात अहवालात त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यामुळे डिसले गुरुजी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माढा तालुक्यातील परितेवाडी, कदम वस्ती या शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी सरकारी पद्धतीने आवश्यक तेथे परवानगी न घेता कामकाज केले. अधिकार नसताना पासवर्ड वापरून वेतन काढले. हजेरीपत्रक नसणे, प्रतिनियुक्तीच्या कालावधीत उपस्थिती सिद्ध न करता येणे, असा ठपका जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने अहवालाद्वारे ठेवला आहे.

शाळेच्या वेतन प्रणालीचा आयडी व पासवर्ड वापरून रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी स्वत:चा पगार काढल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.समितीला डिसले गुरुजी यांनी ४८५ पानांचा लेखी खुलासाही दिला होता. या खुलाशातील एकही मुद्दा मान्य झाला नाही.

Ranjitsinh Disale
Disale Guruji: ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना दणका : 34 महिन्यांचा पगार होणार वसूल

परितेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी डिसले गुरुजी यांचे प्रतिनियुक्ती कालावधीत डायट येथील उपस्थिती अहवाल न घेता वेतन काढले. यादरम्यान डिसले गुरुजी कुठे होते? याबाबत त्यांनी उपस्थिती प्रमाणपत्र शाळेत सादर केले नाही.

या संदर्भात चौकशी समितीच्या सदस्यांनी मुख्याध्यापकांना विचारले असता शालार्थ प्रणालीच्या आयडी व पासवर्डचा वापर करुन रणजितसिंह डिसले यांनीच परस्पर वेतन काढल्याचे त्यांनी सांगितले. "1 नोव्हेंबर 2018 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान प्रतिनियुक्तीला मुदतवाढ दिल्यानंतरही ते उपस्थित राहिले नाहीत," अशी माहिती चौकशी समितीच्या सदस्यांना वेळापूर येथील डायटच्या प्राचार्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com