सोलापूर जिल्हा बॅंकेच्या नशिबातील गुलाल कोणी रोखला?

सोलापुरात चर्चा सांगली अन्‌ सातारा जिल्हा बॅंकेच्या निकालाची
Solapur District Bank
Solapur District Bank sarkarnama

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) जिंकले. राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे काका आमदार मोहनराव कदमही जिंकले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) पडले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेही (Shashikant Shinde) पडले. सांगली, सातारा जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल राज्यभर चर्चेत आला आहे. सांगली आणि सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या गुलालात माखली असताना मग सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीला का घाबरली? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. (Discussion in Solapur about the result of Sangli and Satara District Bank)

सातारा जिल्हा बॅंकेच्या राजकारणात आमदार शशिकांत शिंदे यांचा करेक्‍ट कार्यक्रम कोणी केला?, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी डाव साधला? की भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आमदार शिंदे यांचा करेक्‍ट कार्यक्रम केला? याचे राजकीय कोडे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली व सातारा जिल्हा बॅंकेसोबतच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेलाही गुलालात माखण्याची संधी आली होती. गुलालात माखण्याऐवजी सोलापूर डीसीसी निवडणुकीला का घाबरली? हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

Solapur District Bank
यशवंतरावांच्या समाधीवर पद्मश्री ठेवून पोपटराव पवारांनी केले अभिवादन

सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलून कोणी कोणाचे हित साधले? हा प्रश्न आजही सोलापूरच्या राजकारणात अनुत्तरीतच आहे. सांगली जिल्हा बॅंकेला 94 वर्ष पूर्ण झाली. संचालकांच्या खाबुगिरीत एकेकाळी अडकलेल्या सांगली बॅंकेवर तब्बल पावणे तीन वर्षे प्रशासक होते. खाबूगिरीतील सांगली बॅंकेला पुन्हा संचालकांच्या हाती करणारे सांगली जिल्हा बॅंकेचे डॉक्‍टर तथा प्रशासक शैलेश कोथमिरे सध्या सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेचे प्रशासक आहेत. संचालक गेले आणि प्रशासक आले, सोलापूर बॅंक मात्र आजही जुनेच घाव सोसत आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीच्या गुलालात माखणार की प्रशासकाच्या माध्यमातूनच बॅंकेचा कारभार हाकला जाणार? याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Solapur District Bank
नाराज बाबाजीनी दुर्राणींची जयंत पाटील, अजितदादा करणार मनधरणी

सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची कशी लागली वाट?

सन 1975 मध्ये आलेल्या झुंज या मराठी चित्रपटात गीतकार जगदीश खेबूडकर यांनी गायलेले ‘कोण होतीस तू, काय झालीस तू... अगं वेडे कशी वाया गेलीस तू...’ हे गाणं आज सोलापूर जिल्हा बॅंकेच्या आर्थिक आणि राजकीय स्थितीला तंतोतंत लागू पडते. पश्‍चिम महाराष्ट्रात असलेल्या पुणे जिल्हा बॅंकेची स्थापना 1917 मध्ये झाली. त्यानंतर अवघ्या एका वर्षात म्हणजे 1918 ला सोलापूर जिल्हा बॅंकेची स्थापना झाली. सांगली जिल्हा बॅंक 1927 ला तर कोल्हापूर जिल्हा बॅंक 1938 ला सुरु झाली. सातारा जिल्हा बॅंक 1950 ला सुरु झाली. पुणे जिल्हा बॅंक जेव्हा स्थापन झाली, त्यानंतर अवघ्या एका वर्षात 1918 ला सोलापूर जिल्हा बॅंक स्थापन झाली. सुमारे 103 वर्षांचा इतिहास असलेल्या आणि पूर्वजांनी जपलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची कशी व का वाट लागली? याचा धांडोळा आणि भविष्याचा वेध घेणारी ही वृत्तमालिका...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com