Devendra Fadnavis News : शिर्डी विमानतळावर फडणवीस अ्न विखेंमध्ये गुप्त चर्चा; नाशिकबद्दल खलबतं?

Devendra Fadnavis News : बीडमधील गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली.
Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil News
Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil NewsSarkarnama

Devendra Fadnavis News : बीडमधील गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. त्या आधी ते शिर्डी विमानतळावर आले होते. तेथून ते हेलिकॉप्टरने बीडला रवाना झाले होते. त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि फडणवी यांच्यामध्ये एकांतात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील समजला नसला तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही यासंबधी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

विखे पाटील यांनी फडणवीस यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा आणि तिळगुळ दिले. याप्रसंगी भाजपचे (BJP) संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शिवीजी धुमाळ, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, श्रीरामपूरचे तालुका अध्यक्ष दीपक पठारे उपस्थित होते. त्यानंतर फडणवीस आणि विखे यांनी बाजूला जाऊन चर्चा केली. याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil News
Pankaja Munde News : पंकजाताईंचा होमपिचशी असलेला संपर्क तुटतोय...तर फडणवीसांचा ‘कनेक्ट’ वाढतोय....!

माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले. मात्र, सत्यजीत तांबे यांच्याविषयी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीच खुलासा करावा. ते अद्याप यावर काहीच बोले नाही. या घडामोडीला त्यांची समंती होती का, असा सवाल त्यांनी केला. त्यांची काय भूमिका आहे, हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असे विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

तांबे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने पाठिंबा दिला. मात्र, तांबे यांना अद्याप भाजपने पाठिंबा जाहिर केलेला नाही. काँग्रेसचाही (Congress) अंतिम निर्णय झाला नाही. तांबे यांनीही भाजपकडे अद्याप अधिकृतरित्या पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे भाजपचा काय निर्णय होणार याकडे राजकयी वर्तुळसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत फडणवीस यांनी विखे पाटील यांचे मत जाणून घेतल्याचे सांगितले जात आहे.

Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil News
Satyajeet Tambe News; `टीडीएफ` नंतर शिक्षक सेनेने देखील तांबेंना झिडकारले!

विखे हे तांबे यांना पाठिंबा देण्यास अनुकूल की प्रतिकूल आहेत, हेही अद्याप समोर आलेले नाही. नगरमध्ये बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पक्ष देईल तो आदेश मान्य करू, असे म्हटले होते. त्यामुळे तांबे याच्यासंबंधी भूमिका घेताना विखे पाटील हे स्थानिक राजकारणाचा विचार करणार, हे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com