NCP Vs BJP : दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज्यात एक हाती कारभार सुरू आहे

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली.
Dilip Walase Patil
Dilip Walase PatilSarkarnama

NCP Vs BJP : पुणे - शिवसेनेत फुट पडल्याने राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली. एकनाथ शिंदे गट व भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र एक महिना होऊनही राज्याच्या मंत्रीमंडळात केवळ दोनच मंत्री आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मावळमध्ये लहान मुलीबाबत घडलेली घटना ही क्रुर व दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यावेळी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच भूमिका सर्वांची असते. मात्र कायद्याच्या मर्यादा लक्षात घेऊन शेवटपर्यंत जायला फार वेळ लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात शक्ती नावाचा कायदा केला. त्या कायद्याला अजूनही राष्ट्रपतींची संमती प्रलंबित आहे. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यावर या कायद्याची अंमलबजावणी राज्यात होऊ शकेल.

Dilip Walase Patil
Shiv sena : कात्रजमध्ये पुन्हा शिंदे -ठाकरे गट आमने-सामने येणार ; उदय सामंतांचे आव्हान

ते पुढे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोनच मंत्री आहेत. या दोघांत कोणतेही विभाग वाटून देण्यात आलेले नाहीत. राज्यात एक हाती कारभार सुरू आहे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक निर्णय प्रलंबित राहत आहेत. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत आहेत. सरकार तयार झाल्यावर ताबडतोब मंत्रीमंडळ तयार होणे आवश्यक आहे.

Dilip Walase Patil
NCP News: येवल्यात ४ पैकी ३ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीने जिंकल्या

मंत्रीपदाचे वाटप कशामुळे प्रलंबित आहे हे कळत नाही. बहुतेक त्यात काही तरी न्यायालयीन अडचण असावी. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पुढे ढकलला जात असावा, असे त्यांनी सांगितले.

पदभरती परीक्षा घोटाळ्याची कागदपत्रे ईडीने मागविली आहेत. यावर त्यांनी सांगितले की, परीक्षा घोटाळा झाला त्यावेळी घोटाळ्याचा तपास पारदर्शकपणे केलेला आहे. त्यावर ईडीला आणखी काही तपासायचे असले तर तपासावे त्याला आमची काही हरकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com