डिझेल चोरांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला

या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परप्रांतीय आहे.
डिझेल चोरांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला
CrimeSarkarnama

नेवासे ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावठी कट्टे, जीवघेणे हल्ले, तहसीलदारावर हल्ले असे प्रकार घडत असताना आता चोरांनी चक्क पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना नेवासे तालुक्यात घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परप्रांतीय आहे. ( Diesel thieves attack police )

डिझेल चोरीच्या रॅकेटवर छापा टाकण्यास गेलेल्या नेवाशाच्या पोलिस पथकावर काल ( शुक्रवारी ) पहाटे हल्ला झाला. अंगावर वाहन घातल्याने पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासह चार कर्मचारी जखमी झाले. डिझेलच्या सहा कॅनसह एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime
अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा

पोलिस निरीक्षक करे यांच्यासह फौजदार समाधान भाटेवाल, कर्मचारी बबन तमनर, अंबादास गिते, योगेश आव्हाड, रामचंद्र वैद्य, संदीप म्हस्के, बाळासाहेब खेडकर यांचे पथक डिझेलचोरीच्या रॅकेटवर कारवाईसाठी गेले. चोरी करीत असलेल्या आरोपीजवळ जाताच कारमधील (एमपी 13 सीएडी 1808) चौघांनी पोलिसांच्या अंगावर वाहन घातले. यामध्ये चार पोलिस जखमी झाले आहेत.

Crime
फडणवीसांची खेळी : राम शिंदेंकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी

ही घटना त्रिमूर्ती विद्यालयसमोरील रस्त्यावर घडली. घटनेनंतर कार वेगाने कुकाण्याच्या दिशेने गेली. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला होता. भानसहिवरे, शनिशिंगणापूर, सोनई असा पाठलाग झाल्यानंतर मोरया चिंचोरे हद्दीत गुन्हे अन्वेषण पथक व नेवासे पोलिसांनी चनसिंग प्रेमसिंग ठाकूर (वय 28, रा. माझापूर, मध्य प्रदेश) यास अटक केली. विकास मूलचंद कुशवाह, जांबाझ कसाब खान, विकास मूलचंद कुशवाह पळून जाण्यात यशस्वी झाले. अधिक तपास फौजदार समाधान भाटेवाल करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in