Satara : ४८ तासांचे सरकार केलं, ती बेईमानी नव्हती का... शंभूराज देसाई अजितदादांवर बरसले

शिवसेना Shivsena प्रमुखांचे विचार जे हिंदूत्वाच्या Hindutva विचारांपासून बाजूला नेण्याचे काम उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी Mahavikas aghadi government सरकारच्या काळात केलं.
Ajit Pawar, Shambhuraj desai
Ajit Pawar, Shambhuraj desaisarkarnama

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते असून त्यांच्यासोबत ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख एकवटले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये जे ४८ तासांचे सरकार अजितदादांनी केलं होते. ती बेईमानी नव्हती का. तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारले होते का, असा प्रश्न राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना केला आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पाटणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एकनाथ शिंदे ज्या पक्षात राहिले व वाढते तेथेच त्यांनी बेईमानी केली, अशी चुकीची टीका अजित पवार यांनी केली आहे. त्यांची टीका शिंदे समर्थकांना सहन झालेले नाही.

शंभूराज देसाई म्हणाले, शिंदे साहेबांनी व आम्ही कधीच बेईमानी केलेली नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार जे हिंदूत्वाच्या विचारांपासून बाजूला नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलं. ते शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं आहे. त्याला बेईमानी हा शब्द अजितदादा पवार वापरत असतील. तर त्यांनी मागील काळात २०१९ मध्ये जे ४८ तासांचे सरकार केलं होते. ती बेईमानी नव्हती का, असा प्रश्न मंत्री देसाई यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar, Shambhuraj desai
Satara : शंभूराज देसाई राष्ट्रवादीवर भडकले... म्हणाले कितीही ताकत लावा...

तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना पवार ते म्हणाले, पहाटेच शपथविधी करताना तुमचे पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांना तुम्ही विचारले होते का, असा प्रश्न विचारला केला तर तो तुम्हाला योग्य वाटणार नाही. विरोधी पक्ष नेते अजित पवारांना विनंती आहे की, एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते आहेत. ४० आमदार १२ खासदार १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत.

Ajit Pawar, Shambhuraj desai
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून पुण्याचं वाटोळं केलं : अजित पवार भाजपवर बरसले

त्यांना एवढा मोठा भक्कम पाठींबा मिळत असताना त्यांच्या कृतीला आमच्या भुमिकेला व उठवाला बेईमानी शब्द वापरतात, हे पूर्णपणे चुकीचे असून ते आम्ही सहन करणार नाही. सडेतोड आहात पण बोलतना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, लाखो समथृक शिंदेसाहेबांचे आहेत. त्यांच्या भावना दुखावणार नहीत याची काळजी घ्यावी. अशा पद्धतीचे वक्तव्य यापुढे आम्ही सहन करणार नाही.

Ajit Pawar, Shambhuraj desai
Eknath Shinde Talk About CM Position : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले गुपित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com