'लोकशाही समोर आज अखेर हुकूमशाही झुकली !'

अखेर केंद्रातील भाजप ( BJP ) सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.
'लोकशाही समोर आज अखेर हुकूमशाही झुकली !'
जयंत पाटीलsarkarnama

मुंबई : केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही उभे केले होते. अखेर केंद्रातील भाजप सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. Dictatorship finally bowed before democracy today!

केंद्राच्या या निर्णया बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटलांनी म्हटले आहे की, झालेली चूक सुधारत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी असलेले कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली अशी प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर;पाहा व्हिडिओ

यावर अधिक मत व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होता असे त्यांनी नमूद केले.

जयंत पाटील
जेव्हा जयंत पाटील लोकलने प्रवास करतात...

जवळपास 630 शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्र सरकारने करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in