खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया..

अखेर सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली.
Renu Sharma, Dhananjay Munde on  Renu Sharma, Dhananjay Munde News
Renu Sharma, Dhananjay Munde on Renu Sharma, Dhananjay Munde Newssarkarnama

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत एका महिलेने पाच कोटींची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुंबईच्या पोलिस ठाण्यात इंदूरमधील एका महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्या महिलेला मुंबई पोलिसांनी इंदूर येथून अटक केली आहे. तिच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Dhananjay Munde on Renu Sharma)

मुंडे यांच्याविरोधात बलाकाराची तक्रार करण्याची धमकी देऊन ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma) हीला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला आज अटक केली आहे. मुंडे यांनी या महिलेची मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आपण या महिलेला ओळखत असल्याचे धनजंय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता,''असे धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यानंतर या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी मुंडेंनी दिली होती.

रेणू शर्मा हीने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच तिने ही तक्रार मागे घेतली होती.तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून मुंडेंकडून पैश्यांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसाना दिले आहे.

Renu Sharma, Dhananjay Munde on  Renu Sharma, Dhananjay Munde News
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माला अटक

धनंजय मुंडे म्हणाले, ''गेल्या दीड-दोन वर्षांपासून हा त्रास सुरु आहे. यापूर्वी त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत घेतली. मागच्या दीड-दोन वर्षात जे सहन करीत होतो. ते सहनशक्तीच्या बाहेर गेल्या होत्या. काही दिवसांपासून त्रास होतोय. तो सहन करतो अखेर शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. माझ्याकडे जे पुरावे होते ते मी पोलिसांनी दिले आहे. आता जे काय करायचं ते पोलीस करतील,''असे मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले.

Renu Sharma, Dhananjay Munde on  Renu Sharma, Dhananjay Munde News
पोलीस बदल्यांवरुन शिवसेनेचे नाराजी नाट्य ; पदोन्नती थांबवण्याची गृहखात्यावर नामुष्की

''पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?''अशा आशयाचे मेसेज तिनं मुंडेंना पाठविला होता. याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. रेणू शर्मा ही मूळ इंदौर( मध्यप्रदेश) येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com