धनंजय महाडिकांची खासदारकी भीमा-लोकशक्ती परिवाराला ठरणार 'टॉनिक'!

खासदार महाडिक यांची साधारणत: दहा ते बारा वर्षांपूर्वी मोहोळच्या राजकारणात एन्ट्री झाली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते मोहोळमध्ये आले.
Dhananjay Mahadik-Vijayraj Dongre
Dhananjay Mahadik-Vijayraj DongreSarkarnama

सोलापूर : भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या विजयाची चर्चा अद्यापही सुरूच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरलेल्या या विजयाचा इफेक्ट जसा कोल्हापूरच्या राजकारणावर होणार आहे. तसाच तो सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या राजकारणावरही होणार आहे. मोहोळ तालुक्यात खासदार महाडिक यांच्या भीमा परिवाराला आणि माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्या लोकशक्ती परिवाराला या खासदारकीतून नक्कीच टॉनिक मिळणार आहे. (Dhananjay Mahadik's MP will be a tonic for Bhima-Lokshakti family)

Dhananjay Mahadik-Vijayraj Dongre
महाडिकांच्या गुलालाचा खरा धक्का शिवसेनेपेक्षा सतेज पाटलांना बसलाय!

खासदार महाडिक यांची साधारणत: दहा ते बारा वर्षांपूर्वी मोहोळच्या राजकारणात एन्ट्री झाली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते मोहोळमध्ये आले. या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन आमदार (कै.) भारत भालके यांच्या माध्यमातून (कै) सुधाकरपंत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनेलला पराभवाचा जबरदस्त झटका दिला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा भीमा कारखान्याची सत्ता खासदार महाडिक यांच्या गटाकडे राहिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०१७ च्या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या भीमा परिवाराला मोहोळच्या राजकारणात लोकशक्ती परिवाराची मोठी साथ मिळाली.

Dhananjay Mahadik-Vijayraj Dongre
‘मोहोळचा पुढचा आमदार भाजपचाच’ : महाडिकांच्या विजयानंतर पक्षनेत्याने केला दावा!

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे व त्यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी राष्ट्रवादीतून बाजूला होत लोकशक्ती परिवाराचा झेंडा रोवला. मोहोळच्या राजकारणात पहिल्यांदा २०१७ मध्ये भीमा-लोकशक्ती परिवाराने राष्ट्रवादीला तगडे आव्हान दिले होते. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन आणि पंचायत समितीच्या बारापैकी सहा जागा मिळविल्या होत्या. या ताकदीच्या जोरावरच लोकशक्ती परिवाराचे विजयराज डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सलग पाच वर्षे सभापतिपद मिळविले होते. या सभापतिपदाच्या जोरावरच महाडिकांच्या पडत्या काळात मोहोळ तालुक्यातील भीमा व लोकशक्ती परिवार जिवंत राहिला.

Dhananjay Mahadik-Vijayraj Dongre
'त्यातील' कोणीतरी शब्द पाळला नाही : अरविंद सावंतांचा रोख कुणाकडे?

कोल्हापुरातील २०१९ ची लोकसभा व विधानसभा, गोकुळ दूध संघ यामधील महाडिक गटाचा झालेला पराभव आणि कोल्हापूर विधान परिषदेची बिनविरोध झालेली निवडणूक या सर्वांचा परिणाम आपसुकच मोहोळमधील भीमा व लोकशक्ती परिवारावर झालेला दिसत होता. राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे मोहोळ तालुक्यातील भीमा व लोकशक्ती परिवाराला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे महाडिकांच्या खासदारकीचा लाभ जसा कोल्हापूर भाजपला होणार आहे, तसाच तो मोहोळ भाजपलाही आगामी काळात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Dhananjay Mahadik-Vijayraj Dongre
नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी महामार्गावरच घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद!

भीमा कारखाना निवडणुकीत होणार फायदा!

खासदार महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारखान्याने यशस्वी केलेला यंदाचा गळीत हंगाम, महाडिक यांना मिळालेली खासदारकी यामुळे कारखान्याची निवडणूक चुरशीची होणार आहे. या शिवाय मोहोळ नगरपरिषद, तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी धनंजय महाडिक यांना मिळालेली खासदारकी मोहोळ व पर्यायाने सोलापूरच्या भाजपला लाभदायक मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in