'नशीब शिवसेनेने मुर्मु यांच्याकडे आदिवासी असल्याचे पुरावे मागितले नाहीत'

Sanjay Raut|Shivsena : स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
Sanjay Raut & Dhananjay Raut Latest News
Sanjay Raut & Dhananjay Raut Latest News Sarkarnama

कोल्हापूर : शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्या आदिवासी महिला आहेत म्हणून आम्ही पाठिंबा देत असून यामागे कुठलही राजकारण नाही, असे स्पष्टीकरण दिलं. मात्र यावरूनच छत्रपती संभाजीराजेंचे (Chhatrapati Sambhajiraje) समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुर्मू यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा म्हणजे उरली सुरली शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी सुचलेलं शहाणपण आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने पाठिंबा दिला असता तर शिवसेनेवर ही वेळ आलीच नसती, अशी जळजळीच टीका स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी केली आहे. त्यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Sanjay Raut & Dhananjay Raut Latest News
शिवसेनेने पाठिंबा देऊनही द्रौपदी मुर्मू 'मातोश्री'वर जाणार नाहीत...

धनंजय जाधव म्हणाले, या देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत आहे याचा अभिमान आहे. परंतु राज्यसभेवेळी छत्रपतींना उमेदवारी दया अशी अनेक आमदारांची भावना लक्षात न घेता शिवसेनेने निर्णय घेतला. तसाच निर्णय जर आता घेतला आसता तर शिवसेनेचे उरले सुरले खासदार देखील आपल्यापासून फुटून जातील या भितीपोटी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची टीका जाधव यांनी केली आहे.

छत्रपतींना वंशज असण्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी नशीब द्रौपदी मूर्मुना आदिवासी असल्याचे पुरावे मागितले नाहीत याचा आपल्याला आनंद आहे, असाही खोचक टोलाही त्यांनी राऊतांना लगावला. पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे 'देर आये दुरुस्त आये' असाच म्हणावा लागेल. शिवसेनेने छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करताना महाराष्ट्राच्या विकासाकडेही लक्ष द्यावे आणि शिवसेनेचे वाचाळवीर नेते जाहीर भाषणातुन छत्रपतींचा चुकिचा इतिहास पेरणार असतील तर आता त्यांचा स्वराज्य संघटना बंदोबस्त करेल, असा इशाराही जाधवांनी दिला आहे.

Sanjay Raut & Dhananjay Raut Latest News
'विद्यमान आघोरी सरकारकडून आततायीपणाचा निर्णय!'

दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना दोन दिवसापुर्वीच शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना कोत्या मनाची नाही. मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या काही नेत्यांनी त्यांना देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्याने आपण पाठिंबा द्यायला हवा, अशी विनंती माझ्याकडे केली होती, असे ठाकरे म्हणाले होते. तर शिवसेनेने याआधीही पक्षाच्या पलिकडे जाऊन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in