देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न

Devendra Fadnavis मध्यरात्री बारा वाजल्यापासून विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजेस सुरुवात झाली.
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न

पंढरपूर : आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. तर मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादमधील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.

मध्यरात्री बारा वाजल्यापासून विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजेस सुरुवात झाली. या पूजेवेळी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. महापुजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरु करण्यात आले. मुख्यमंत्री असताना 4 वेळा आणि कार्तिकीचीही महापूजा करण्याचे भाग्य लाभले हा विलक्षण योग असल्याची भावना देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे आणि संत नामदेव पायरीचे नुतनीकरण लवकरच नुतनीकरण करण्याचे आश्वासनही दिले.

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न
गुलाबराव पाटलांवरील टीका भोवली; ठाकरेंच्या नेत्याला जळगाव जिल्ह्यात भाषण बंदी

सर्वांना विश्वासात घेऊन पंढरपूर कॉरिडॉर केला जाईल. एवढचं नाही तरश्री विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप जपण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणतेही पाडकाम होणार नाही. गरज पडली तर त्याला योग्य मोबदलाही दिला जाईल. स्थानिक नागरिक आणि भाविकांना विश्वासात घेऊनच पंढरपूरच्या विकास आराखडा तयार केला जाईल.

दरम्यान, कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात (Pandharpur)भाविकांची मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागा नदीवर स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली असून संपूर्ण पंढरपुर विठुनामाच्या जयघोषाने दुमदुमन गेले आहे. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com