देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गांधी परिवाराची भेट

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) आज अहमदनगर शहरात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गांधी परिवाराची भेट

Devendra Fadnavis visited the Gandhi family. Chandrakant Patil and Ram Shinde were present on this occasion.

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे आज लग्न आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) आज अहमदनगर शहरात आले आहेत. त्यांनी दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला भेट दिली. Devendra Fadnavis visited the Gandhi family

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सायंकाळी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन गांधी परिवाराची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, श्रीमती सरोज गांधी, सुवेंद्र गांधी, देवेंद्र गांधी, अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा दिप्ती गांधी, संचालिका संगीता गांधी आदी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis visited the Gandhi family. Chandrakant Patil and Ram Shinde were present on this occasion.</p></div>
दिलीप गांधींच्या घरात गुलाल उधळला... पण बँकेवर निर्बंध आले

देवेंद्र फडणवीस यांनी दिलीप गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच त्यांनी भाजप व केंद्रात केलेल्या कामांविषयी सांगितले. या प्रसंगी गांधींच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. पत्रकारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.