देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामांचे कधीही समर्थन करत नाही...

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) काल रात्री (ता. 29) उशीरा मुंबईकडे रवाना होताना सुपे येथे थांबले होते.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Sarkarnama

पारनेर ( अहमदनगर ) : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचा काल ( ता. 29 ) विवाह झाला. या विवाह समारंभाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), भाजप ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा ते मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांचा सुपे येथील भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी त्यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. Devendra Fadnavis said, we never support the wrongdoings of the workers ...

फडणवीस काल रात्री (ता. 29) उशीरा मुंबईकडे रवाना होताना सुपे येथे थांबले होते. त्यांच्या बरोबर माजी मंत्री राम शिंदे व गिरीष महाजन हेही उपस्थित होते. पारनेर तालुका भारतीय जनता पक्ष व सुपे शहर भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा सत्कार झाला. तालुकाध्यक्ष वसंत चेडे, जिल्हा सरचिटणीस सुनिल थोरात, उपसरपंच सागर मैड, अमोल मैड, सोमनाथ नांगरे उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis</p></div>
देवेंद्र फडणवीस ज्या हेलिकॉप्टरने आले त्यानेच बाळासाहेब थोरात निघून गेले

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या पक्षात इतर पक्षाप्रमाणे दुकानदारी चालत नाही. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षनिष्ट व सक्षम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सतत बळ देण्याचे काम करत आहोत, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही कार्यकर्त्यांना ताकद देत नाही असा अरोप चुकीचा आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना चांगल्या व सामाजिक कामासाठी सतत ताकद देत असतो. चुकीच्या कामांचे आम्ही कधीही समर्थन करत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis</p></div>
खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

सुपे स्मार्ट सिटी तयारी व्हावे सुपे येथे औद्योगिक वसाहत व नव्याने उभ्या राहात असलेल्या जापणीज हबमुळे सुप्याचे शहरीकरण होत आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी सुपे गाव एक स्मार्ट सिटी म्हणून तयार व्हावे. यासाठी गावातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी उपसरपंच सागर मैड यांनी निवेदनद्वारे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com