राष्ट्रवादीला लवकरच मोठा धक्का?; नाराज राजन पाटलांसाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावली!

मोहोळमधील मर्जीतील नेत्यास देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे.
Rajan Patil-Devendra Fadnavis-Sanjay Kshirsagar
Rajan Patil-Devendra Fadnavis-Sanjay KshirsagarSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : ऐन पावसाळ्यात मोहोळ तालुक्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)नाराज असलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) व त्यांच्या दोन चिरंजीवाच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चेच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोहोळ येथील भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांना मंगळवारी (ता. १९ जुलै) मुंबईला तातडीने येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत नाराज असलेले राजन पाटील यांना भाजपत आणण्यासाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे मोहोळमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे. (Devendra Fadnavis fielded for a disgruntled Rajan Patil)

दरम्यान मी माझ्या ‘जनकल्याण शुगर लिमिटेड’ या साखर कारखान्याच्या कामासाठी मुंबईला चाललो आहे, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली. निमित्त जरी साखर कारखान्याच्या कामाचे असले तरी मोठ्या राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठीच क्षीरसागर यांना पाचारण केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Rajan Patil-Devendra Fadnavis-Sanjay Kshirsagar
शिवसेनेला पुण्यात आणखी एक धक्का : जिल्हाप्रमुख कोंडे मुख्यमंत्री शिंदे गटात

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी गेल्या साधारण पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट करीत भाजप प्रवेशाचे संकेत दिले असल्याची चर्चा तालुक्यात चवीने चर्चेली गेली. त्याच पोस्टच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती विजयराज डोंगरे यांनीही समाज माध्यमावर पोस्ट टाकून ‘इथे फक्त न्याय असतो, तसेच देशाच्या प्रगतीसाठी महत्त्व दिले जाते’ असे संकेत दिले होते. त्यामुळे या दोन्ही पोस्टची तालुक्यासह जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली होती.

Rajan Patil-Devendra Fadnavis-Sanjay Kshirsagar
Presidential Election : डॉ. मनमोहनसिंगांनी व्हीलचेअरवरून येत बजावले मतदानाचे कर्तव्य!

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. निमित्त जरी जनता दरबाराचे असले तरी उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे उमेश पाटलांचा जनता दरबार राजन पाटलांना जाचक ठरू लागला आहे. त्यामुळे तालुक्यात एक संघ असलेल्या राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत.

Rajan Patil-Devendra Fadnavis-Sanjay Kshirsagar
महाराष्ट्रातील एसटी बसला मध्य प्रदेशात भीषण अपघात; तेरा जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची भीती

माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याची कोंडी झाली, या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोचल्या आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष उमेश पाटील यांना बळ देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोहोळ तालुक्यात शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थिती लावली होती, पण हा विषय बाजूला पडला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याबद्दल उघड नसला तरी राजन पाटील समर्थकांचा छुपा रोष आहेच.

राजन पाटील व त्यांच्या दोन चिरंजीवांनी राष्ट्रवादी सोडल्यास पक्षाला त्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राजन पाटील व त्यांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादी सोडणे फायदेशीर नसल्याचे सूतोवाच केल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.

Rajan Patil-Devendra Fadnavis-Sanjay Kshirsagar
मंत्रिमंडळात किमान 12 जण हवेच : माजी मुख्य सचिवांनी सांगितला नियम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी आहेत. त्यांनी स्वतःहून ही जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील घडामोडींकडे त्यांचे बारीक लक्ष असते. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी क्षीरसागर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तालुक्याच्या राजकारणाची माहिती घेतली आहे. त्याचवेळी क्षीरसागर यांना मुंबईला पाचारण केल्याने तालुक्यात उलट सुलट राजकीय चर्चेला उधाण आले आहे. क्षीरसागर यांनी २०१४ मध्ये भाजपच्या वतीने विधानसभा लढवली होती. त्यात त्यांना केवळ साडेचार हजार मतांनी पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे क्षीरसागर यांच्या मुंबई वारीने सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

फडणवीस विचारतील ती माहिती देणार : क्षीरसागर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला भ्रमणध्वनी करून मोहोळ तालुक्यातील राजकीय व सर्वच सद्यस्थितीचा अंदाज घेतला. मोहोळ हा राज्याच्या नकाशावरचा तालुका आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे मी देणार असून, पक्षाला सकारात्मकता येईल अशी माझी भूमिका असणार आहे. मसले चौधरी (ता. मोहोळ) येथील ‘जनकल्याण शुगर्स लिमिटेड’ या माझ्या साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी मुंबईला चाललो आहे, असे सांगत कारखान्याच्या कामासाठी फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे, असे भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com