फडणवीस, चंद्रकांतदादांसह ४० स्टार प्रचारक उतरुनही भाजपचा मोठा पराभव

Devendra Fadnavis | chandrakant Patil | Kolhapur | Kolhapur North Bye poll : महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis-chandrakant Patil
Devendra Fadnavis-chandrakant PatilSarkarnama

कोल्हापूर : मागच्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North Poll Bye Election) पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला ४० स्टार प्रचारक उतरुनही पराभव स्विकारावा लागल्याचे चित्र आहे. (Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnuk)

भाजपने उतरवले होते ४० स्टार प्रचारक

कोल्हापूर उत्तरचे मैदान मारण्यासाठी भाजपने राज्यभरातील पक्षाचे सर्व बडे नेते हे या मतदारसंघात प्रचारात उतरवले होते. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर करावी लागते. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी ४० प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत यांचा समावेश होता.

Devendra Fadnavis-chandrakant Patil
कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपला नाकारले

या सर्वांच्या जोडीला इतर नेत्यांचीही फौज देण्यात आली होती.

यात आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, सुरेश हाळवणकर, चंद्रशेखर बावनकुळे, धनजंय महाडिक, सुरेश खाडे, समरजीत घाडगे, महेश जाधव, अतुल भोसले, राहुल चिकोडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, विक्रांत पाटील, एजाज देशमुख, शौमिका महाडिक यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, डॉ.भागवत कराड यांचेही स्टार प्रचारकांच्या यादीत नाव होते. याशिवाय श्रीकांत भारतीय, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रविंद्र चव्हाण, राज पुरोहित, किरीट सोमय्या, प्रसाद लाड, संदीप भंडारी, सुनील कर्जतकर, उमा खापरे (भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा) आणि पुण्यातील योगेश टिळेकर (भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष) यांचाही स्टार प्रचारकांत समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com