संभाजीराजेंना अपक्ष म्हणून उभे करण्याची फडणवीस अन् भाजपची खेळी! शाहू छत्रपतींचा गौप्यस्फोट

बहुजन समाजाच्या मतांत विभाजन करण्यासाठी भाजपनं टाकला डाव
Devendra Fadnavis and Sambhaji Chhatrapati
Devendra Fadnavis and Sambhaji Chhatrapati Sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. पण कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी यासाठी शिवसेनेकडे बोट दाखवलं आहे. पण त्यांचे पिता शाहू छत्रपती यांनी आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस आणि भाजप हेच मागील सूत्रधार असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. (Sambhajiraje Chhatrapati latest news update)

संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याची फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा खुलासा शाहूंनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला. ते म्हणाले की, या सर्व राजकारणामागे भाजपचाच हात आहे. संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली नाही, त्यामुळं छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. पण यामुळं हा छत्रपती घराण्याचा अपमान झाला, असं म्हणता येणार नाही. ती संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. त्यामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती. संभाजीराजेंना अपक्ष लढावं यासाठी त्यांनी भाग पाडलं.

बहुजन समाजाच्या मतांत विभाजन करण्यासाठी भाजपने हा डाव टाकला होता. संभाजीराजे हे जानेवारी महिन्यापासून राज्यसभेसाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापन केली आहे. संभाजीराजेंना आता दीर्घकाळ लढा द्यावा लागणार असून, हा संघर्ष खूप मोठा आहे, असंही शाहू छत्रपतींनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis and Sambhaji Chhatrapati
आर्यन खानला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न! एनसीबीनं वानखेडेंवर फोडलं खापर

राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीसाठी संभाजीराजेंनी शिवबंधन हाती बांधावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांच्यासमोर ठेवला होता. पण संभाजीराजेंनी त्यास नकार दिल्याने शिवसेनेने कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी अपक्ष न लढता माघार घेतली. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संभाजीराजेंनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं होतं.

Devendra Fadnavis and Sambhaji Chhatrapati
चंद्रकांतदादा अडचणीत! रुपाली चाकणकर 'अॅक्शन मोड'वर

संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात होते. संभाजीराजेंनी यानंतर स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. तसेच, पुढील विधानसभा निवडणुका या संघटनेच्या माध्यमातून लढवण्याचे जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com