Maan : देशमुख कर्तृत्वशून्य; भाजपकडे महामंडळ मागताना त्यांचे पवार प्रेम कुठे होते...

Jaykumar Gore माजी जिल्हाधिकारी, आयुक्त, सचिव अशी पदे भूषवितानाची कारकीर्द झोलझालची असणारे प्रभाकर देशमुख प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आमदार गोरेंविषयी बोलले आहेत.
Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
Jaykumar Gore, Prabhakar Deshmukhsarkarnama

-विशाल गुंजवटे

Maan News : म्हसवडमध्ये येऊन माणला पाणी कुठले देणार, पाणी देणे शक्य नाही, असे सांगणाऱ्या पवारांनी माण- खटावच नव्हे, तर जिल्ह्यासाठीही योगदान दिले नाही, हे वास्तव सांगणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंवर Jaykumar Gore बोलण्याचा अधिकार प्रभाकर देशमुखांना Prabhakar Deshmukh नाही. पवारांशी लबाड बोलून गद्दारी करणारे कर्तृत्व शून्य देशमुख जनतेच्या कोणत्याच कामाचे नाहीत, असा टोला भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी लगावला.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘माजी जिल्हाधिकारी, आयुक्त, सचिव अशी पदे भूषवितानाची कारकीर्द झोलझालची असणारे प्रभाकर देशमुख प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आमदार गोरेंविषयी बोलले आहेत. भिलार येथे भाजप कार्यकारिणीत बोलताना आमदार गोरेंनी वास्तव मांडले होते. माण- खटावला पाणी द्यायला पवारांनी असमर्थता दर्शविली होती. त्यांनी पाणी दिले नाही, म्हणूनच पाणी देणारे जयकुमार गोरे आमदार झाले आहेत.

गेली अनेक वर्षे जिल्ह्याने पवारांची पाठराखण केली; पण त्यांनी जिल्ह्याला त्यामानाने काहीच दिले नाही. देशमुख मात्र, त्यांची चाकरी इमाने इतबारे करत आहेत. सबसे बडे गद्दारही देशमुखच आहेत. भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी किती पायऱ्या झिजवल्या. ते आम्हाला माहीत आहे. भाजपकडे महामंडळ मागणी करताना त्यांचे पवार प्रेम कुठे गेले होते?’’

Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
Maan News: लबाडांना पवारांचे योगदान काय कळणार; जबाबदारीचे भान ठेऊन बोला...

माण आणि खटावमधील गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यासाठी सर्व्हे करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्येच दिले होते. अडीच वर्षे तुमचे सरकार आले म्हणून ते काम थांबले. आता पुन्हा फडणवीसांच्या काळातच ते पूर्ण झाले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
Maan : माढा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देणार.... जयकुमार गोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in