Patan APMC News : पाटणमध्ये देसाई, पाटणकर गटात लढत; पालकमंत्र्यांची प्रतिष्ठापणाला...

Patan News बाजार समितीसाठी ४२६० इतके एकूण मतदार आहेत. ३० एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत मतदान व त्याचदिवशी सायंकाळी पाटण येथेच मतमोजणी होणार आहे.
Satyajeet Patankar, Shambhuraj Desai
Satyajeet Patankar, Shambhuraj Desaisarkarnama

-जालिंदर सत्रे

Patan APMC News : पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे पारंपरिक शंभूराज देसाई Shambhuraj Desai व विक्रमसिंह पाटणकर Vikarmsinh Patankar गटात अटीतटीची लढत होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सुभाषराव पवार, मंगल पाटील, मनोज पाटील, बबन भिसे या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता १७ जागांसाठी ३४ उमेदवारी अर्ज राहिले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारणसाठी दत्तात्रय कदम, झुंजार पाटील, सुभाष पाटील, चंद्रशेखर मोरे, अभिजित जाधव, दादासाहेब जगदाळे, अमरसिंह पाटील.

तसेच महिला प्रतिनिधीमधून रेखा पाटील, लतिका साळुंखे. इतर मागासवर्गीय उत्तम कदम, भटक्या विमुक्त जाती जगन्नाथ शेळके, ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून मोहनराव पाटील, सीताराम मोरे, अनुसूचित जाती उत्तम पवार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संदीप पाटील अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी अरविंद पाटील, बाळासाहेब महाजन.

Satyajeet Patankar, Shambhuraj Desai
Patan Politics : शेतकऱ्यांची ससेहोलपट रोखण्यासाठी पाटण बाजार समिती ताकतीने लढणार : शंभूराज देसाई

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारणमधून संग्राम मोकाशी, मानसिंग कदम, विलास गोडांबे, राजेंद्र पाटील, सीताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, दादासाहेब जाधव, महिला प्रतिनिधी वैशाली शिंदे, जयश्री पवार, इतर मागासवर्ग नितीन यादव, भटक्या विमुक्त जाती धनाजी गुजर.

Satyajeet Patankar, Shambhuraj Desai
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे किती आमदार; त्यांनी आत्मपरिक्षण करावे...शंभूराज देसाई

ग्रामपंचायतीमधून सर्वसाधारणसाठी जोतिराम काळे, समीर भोसले, अनुसूचित जाती सिद्धार्थ गायकवाड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल सुधाकर देसाई, अनुज्ञप्तीधारक व अडते प्रतिनिधी अविनाश नाझरे, अरुण जाधव अशी समोरासमोर अटीतटीची लढत पाहावयास मिळणार आहे.

Satyajeet Patankar, Shambhuraj Desai
Pune Jumbo Covid Centre Scam: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून सत्ताधारी पाटणकर गटाचा एकमेव आनंदराव पवार यांचाच उमेदवारी अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून गेले आहेत.पाटण बाजार समितीसाठी ४२६० इतके एकूण मतदार आहेत. ३० एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत पाटण येथे मतदान व त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पाटण येथेच मतमोजणी होणार आहे.

Satyajeet Patankar, Shambhuraj Desai
Modi Government : मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट मिळणार ; पगारात होणार इतकी वाढ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com