Maan : माण एमआयडीसीच्या स्थलांतरास उपमुख्यमंत्र्यांचा विरोध : आमदार गोरे

दुष्काळी भागात drought areas रोजगारसंधी उपलब्ध करण्याला आमचे प्राधान्य राहिल असे उपमुख्यमंत्री DyCM देवेंद्र फडणवीस devendra Fadanvis यांनी सांगितल्याचे आमदार गोरे MLA Jaykumar Gore यांनी सांगितले.
Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Devendra Fadanvis, Jaykumar Goresarkarnama

बिजवडी : मुंबई-बंगलोर आर्थिक कॉरिडॉर स्थापन करण्यासाठी राज्य औद्योगिक महामंडळाकडून मंजूरी देण्यात आलेली माण तालुक्यातील म्हसवड, धुळदेव येथील एमआयडीसी कोणत्याही कारणास्तव इतरत्र स्थलांतरित करण्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी विरोध दर्शविला आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार गोरे यांनी याविषयी भेट घेऊन त्यांना एमआयडीसी स्थलांतरित न करण्याबाबत पत्र देण्यात आले. जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे कि, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून म्हसवड, धुळदेव परिसरातील २९३२.७३ आर खाजगी क्षेत्रास आर्थिक कॉरिडॉर करण्यासाठी मंजूरी दिली आहे.

Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Video: रामराजेंनी राष्ट्रवादीला मान खाली घालायला लावली; जयकुमार गोरेंची टिका

२२ जून रोजी शासन राजपत्रात तसे नमूद करण्यात आले आहे. या एमआयडीसीमुळे माझ्या माण - खटावसह दुष्काळी भागातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत सदर एमआयडीसी इतरत्र हलविण्याबाबत विचार झाला असल्याचे समजत आहे.

Devendra Fadanvis, Jaykumar Gore
माण तालुक्‍यात आठ हजार हेक्टरवर एमआयडीसी होणार

माण तालुक्यात मंजूर करण्यात आलेली एमआयडीसी दुसरीकडे स्थलांतरित करु नये यासाठी आपण स्वतः लक्ष घालून उपाययोजना कराव्यात असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. माणमध्ये मंजूर असलेली औद्योगिक वसाहत इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार नाही. दुष्काळी भागात रोजगारसंधी उपलब्ध करण्याला आमचे प्राधान्य राहील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.

Devendra Fadanvis, Jaykumar Gore
रामराजेंनीच माण तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं...जयकुमार गोरे

पाणी आलंय आता एमआयडीसीही होणार....

माझ्या दुष्काळी माण खटावमध्ये अथक प्रयत्नांनंतर पाणी आणण्यात यश आले आहे. लवकरच जिहेकठापूरचेही पाणी येत आहे. औद्योगिक वसाहतीसाठी लागणारी मुबलक जमीनही उपलब्ध आहे, त्यामुळे एमआयडीसी म्हसवड, धुळदेव परिसरातच होणार, असा विश्वास आमदार गोरेंनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in