मोहिते पतसंस्थेतील ठेवी मिळेनात; महाराष्ट्र दिनी ठेवीदार आंदोलन करणार

कराड- वाळवा Karad Walva तालुक्यातील Taluka ठेवी Deposit या संस्थेत आहेत. ही काही कोटींच्या घरात आहे. ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार अस्वस्थ Depositors upset आहेत.
Cooperative Patsanstha
Cooperative Patsansthasarkarnama

कराड ः राज्यातील सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या माजी सहकार मंत्री कै. यशवंतराव मोहिते यांच्या नावाने असलेल्या कराड येथील यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्थेतील ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत. उद्या महाराष्ट्र दिनी पतसंस्थेचे संस्थापक आणि यशवंतराव मोहिते यांचे पुत्र डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या घरासमोर बळीराजा शेतकरी संघटना आणि ठेवीदार आंदोलन करणार आहेत.

राज्यातील सहकार चळवळीचा इतिहास मांडताना यशवंतराव मोहिते हे नाव आदराने घेतलं जातं. यशवंतराव मोहिते सहकार मंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयामुळे राज्यातील सहकार चळवळीला दिशा मिळाली. मात्र, त्यांच्या नावाने काढण्यात आलेली कराड येथील यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्था अडचणीत आली आहे.

Cooperative Patsanstha
माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी

कराड- वाळवा तालुक्यातील ठेवीदारांच्या ठेवी या संस्थेत आहेत. ही काही कोटींच्या घरात आहे. ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार अस्वस्थ आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंत संस्था व्यवस्थापणाकडून ही प्रतिसाद मिळत नसल्याने आता ठेवीदार आक्रमक झालेत. उद्या महाराष्ट्र दिना दिवशी बळीराजा शेतकरी संघटना आणि ठेवीदार डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

Cooperative Patsanstha
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

यशवंतराव मोहिते यांच्या सारख्या तत्वनिष्ठ नेत्याच्या नावाच्या पतसंस्थेवर अशी वेळ यायला नको पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे निकटवर्तीय म्हणून डॉ. इंद्रजीत मोहिते यांना ओळखले जाते. कदम यांनी लक्ष घालून ठेवी परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com