कोरेगावात महेश शिंदे समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde बंडात सातारा जिल्ह्यातील Satara district गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai व कोरेगावचे आमदार महेश शिंदे mahesh shinde यांचा समावेश आहे.
Koregaon Demonstration
Koregaon Demonstrationsarkarnama

सातारा : शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आज कोरेगावात रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत मेळावा घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला. एकच वादा महेश दादा, महेश शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.., आमदार महेश शिंदेसाहेबांचा विजय असो, अशी घोषणाबाजी समर्थकांनी केली. या मेळाव्यास मोठ्यासंख्येने जनसागर लोटला होता.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३० आमदारांसह बंड पुकारले आहे. हे सर्व आमदार सध्या गुहाटीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे स्थानिक शिवसैनिक एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे सांगत एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर बंडखोर आमदारांच्या समर्थकांनीही आपल्या नेत्यांच्या बाजूने आपली ताकद असल्याचे दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

Koregaon Demonstration
अजितदादा मुख्यमंत्र्यांना जुमानत नव्हते... आम्ही काय करायचे... महेश शिंदेंची खदखद

एकनाथ शिंदेंच्या बंडात सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. आज कोरेगावात आमदार महेश शिंदेंच्या समर्थकांनी पाठींबा दर्शवण्यासाठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. तसेच महेश शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी मेळाव्याच्या माध्यमातून आमदार महेश शिंदेंनी कोरेगाव मतदारसंघात केलेल्या कामांची व कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच सर्व समर्थकांनी आमदार महेश शिंदेंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com