तीन लाखांची लाचेची मागणी : साताऱ्यात उत्पादन शुल्क विभागातील तिघांवर गुन्हा

लाचेची Bribe मागणी झाल्याची पडताळणी केल्यानंतर या विभागाने संबंधित तिघांविरोधात सातारा शहर पोलिसात Satara City Police station गुन्हा दाखल केला आहे.
तीन लाखांची लाचेची मागणी : साताऱ्यात उत्पादन शुल्क विभागातील तिघांवर गुन्हा
Bribesarkarnama

सातारा ः बियर शॉपीच्या लायसन्सचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तीन लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील निरिक्षक, दुय्यम निरिक्षकासह जवानावर सातारा शहर पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे बियर शॉपीच्या लायसन्सचे प्रकरण सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रलंबित होते. हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी या कार्यालयातील दुय्यम निरिक्षक दत्तात्रेय विठोबा माकर (वय ५६), जवान नितीन नामदेव इंदलकर (वय ३६) यांनी तीन लाखांची मागणी केली होती.

Bribe
नाशिकच्या ४ आमदारांवर लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे संकट?

यासाठी कार्यालयातील निरिक्षक सतीश विठ्ठल काळभोर यांनी या दोघांना याबाबतची प्रेरणा दिली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली होती. त्यावरून लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक अशोक शिर्के यांच्या सूचनेनुसार पोलिस निरिक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक विनाद राजे, विशाल खरात, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी सापळा रचला.

Bribe
'डीवायएसपी'ने मागितली दोन कोटींची लाच अन् अडकला 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

त्यामध्ये त्यांनी लाचेची मागणी झाल्याची पडताळणी केली. त्यानुसार या विभागाने संबंधित तिघांविरोधात सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या कामी लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.