लोणी खुर्दमध्ये 20 वर्षांनंतर विखे गटाचा पराभव : राष्ट्रवादीने मिळविली सहकारी सेवा सोसायटी

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे.
लोणी खुर्दमध्ये 20 वर्षांनंतर विखे गटाचा पराभव : राष्ट्रवादीने मिळविली सहकारी सेवा सोसायटी
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi NewsSarkarnama

अहमदनगर - राहाता तालुक्यातील लोणी म्हंटले की त्यातील सर्व सहकारी संस्था विखे गटाकडे असणार हे समीकरण होते. मात्र यंदा या समीकरणाला तडा गेला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर लोणी खुर्दमधील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणुकीत विखे गटाचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. ( Defeat of Vikhe group after 20 years in Loni Khurd: Co-operative Service Society won by NCP )

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने लोणी खुर्द सहकारी सेवा सोसायटीत विखे गटाचा 13/0 असा दारुण पराभव झाला. राहाता तालुक्यात अनेक सोसायट्या बिनविरोध करण्यात विखे पाटलांना यश आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनार्दन घोगरे यांनी जोरदार धक्का दिला आहे. (Radhakrishna Vikhe Patil News)

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

लोणी खुर्द गावात राष्ट्रवादीच्या जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन मंडळाने बाजी मारली. या विजयानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला तसेच फटाक्यांची आतषबाजी केली. विखे गटाचा हा पराभव जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi News
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

थोरातांच्या गावातही विखेंचा पराभव

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात ( ता. संगमनेर ) देखील विखे गटाचा पराभव झाला. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मंडळाने सर्व जागांवर विजय मिळवत विखे गटाचा १३/० असा पराभव केला आहे. जोर्वे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडलेले असले तरी विखेचा करिष्मा गावात दिसून आला नाही. हे दोन्ही पराभवांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय प्रभाव पडतो हे लवकरच ठरणार आहे. त्यामुळे या पराभवाचा वचपा विखे गट घेणार का?, यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in