Maharashtra Rain News : अतिवृष्टीचे 89 बळी; 27 जिल्ह्यांना बसला तडाखा

राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain News, Rain situation Latest News
Maharashtra Rain News, Rain situation Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. काही घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या, घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत राज्यात पावसाने 89 जणांचा मृत्यू झाला असून चार जण अजूनही बेपत्ता आहेत. तर 181 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. (Maharashtra rain Latest Updates)

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 27 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. या जिल्ह्यांतील 250 हून अधिक गावांमध्ये नद्यांचे पाणी घुसले आहे. मागील चोवीस तासांत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये नागपूरात तिघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर पालघरमध्ये दरड कोसळून एका मृत्यू झाला. रायगडमध्येही एकाचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Rain News, Rain situation Latest News
तू कसा आमदार होतो ते पाहते, फडणवीसांना जाऊन सांगेन! देशमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल

आतापर्यंतचा मृतांचा आकडा 89 वर पोहचला आहे. तसेच चार जण अजूनही बेपत्ता आहेत. पावसामुळे 68 जण जखमी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे 1400 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 44 घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणे तसेच मुसळधार पावसामुळे 181 जनावरे दगावली आहेत.

बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास आठ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला असून सुमारे दोन हजार नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी जवळपास 52 मदत कँप उभारण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. राज्यात एनडीआरएफची 13 पथके राज्यात ठिकठिकाणी बचावकार्य करत आहेत. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड आणि मुंबईत प्रत्येक दोन आणि सातारा, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक पथक आहे. एसडीआरएफचीही पाच पथके बचावकार्यात सहभागी झाली आहेत.

रेड अलर्ट जारी

हवामान विभागाने पुण्यासह मुंबई व राज्यातील अन्य काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in