जिल्हा बँकेच्या नेत्यांची परळीत खलबते; फार्म हाऊसवर ठरली रणनिती...

येत्या सात नोव्हेंबरला सर्वसमावेशक पॅनेलचे उमेदवार निश्चित करून त्यानंतरच्या दोन दिवसात उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये या नेत्यांन कितीपत यश येते त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.
जिल्हा बँकेच्या नेत्यांची परळीत खलबते; फार्म हाऊसवर ठरली रणनिती...

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. खासदार उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्यास नकार दिल्याने ते सध्या आक्रमक होऊन जिल्हा बँकेच्या संचालकांवर टीकेची झोड उठवू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज सातारा तालुक्यातील परळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा बँकेच्या काही संचालकांची खलबते झाली. एका गुरूजींच्या सत्कार समारंभानिमित्त एकत्र आलेल्या या मंडळींनी फार्म हाऊसवर जाऊन एकत्र जेवण करत जिल्हा बँकेची रणनिती ठरवली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. तर काही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचण होऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात अर्ज भरलेल्यांची मनधरणी सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. येत्या सात नोव्हेंबरला सर्वसमावेशक पॅनेलचे उमेदवार निश्चित करून त्यानंतरच्या दोन दिवसात उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये या नेत्यांन कितीपत यश येते त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

जिल्हा बँकेच्या नेत्यांची परळीत खलबते; फार्म हाऊसवर ठरली रणनिती...
लय मस्ती आलीय वाटतं; सभासदांची नव्हे माझी जिरवून दाखवा : उदयनराजेंचा पुन्हा हल्लाबोल

खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून न घेण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे उदयनराजे संतप्त झालेले आहेत. ते गेल्या आठवडाभरापासून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व अध्यक्षांवर टीकेची झोड उठवत इशाराही देत आहेत. ते गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीसह आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी तीन उमेदवार तयार ठेवले आहेत. त्यामुळे उदयनराजेंकडून होणाऱ्या सडेतोड टीकेला उत्तर देणे इतकेच काम विद्यमान संचालकांना राहिले आहे.

जिल्हा बँकेच्या नेत्यांची परळीत खलबते; फार्म हाऊसवर ठरली रणनिती...
उदयनराजेंना दिवाळीचा गोडवा हवा की अन्य काही...

या सर्व पार्श्वभूमीवर आज परळी खोऱ्यातील एका गुरूंजींच्या सत्कारानिमित्त जिल्हा बँकेतील ही सर्व संचालक मंडळी परळीत गेली होती. या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत आखला होता. यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक नितीन पाटील, अनिल देसाई, बिनविरोध निवडून आलेले संचालक राजेंद्र राजपुरे, यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते. येथे या मंडळींनी जेवणानंतर एकत्र बसून जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत खलबते केली.

जिल्हा बँकेच्या नेत्यांची परळीत खलबते; फार्म हाऊसवर ठरली रणनिती...
ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

याविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, परळी खोऱ्यातील गुरूजींच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यानंतर राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत आखला होता, त्याठिकाणी उपस्थित राहिलो. यामध्ये कोणतीही राजकिय चर्चा किंवा जिल्ह बँकेच्या निवडणुकीविषयींची चर्चा झाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in