
सोलापूर : उजनीच्या (Ujani Dam) पाण्यावरून टीका होत असलेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) यांना पालकमंत्री बदलाबाबतचा प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकले. ‘पालकमंत्री बदलणं म्हणजे काय बाजारातील भाजीपाला असतो का? काय तर तुम्ही बातम्या देता. तुम्ही पत्रकारांनीसुद्धा जबाबदारीने बातम्या दिल्या पाहिजेत. एवढ्या सोप्या गोष्टी नसतात,’ असे पालकमंत्री भरणे यांनी पत्रकारानांच ऐकवले. (Dattatray Bharne got angry when the raised the issue of Guardian Minister change)
उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूरचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री भरणे सोलापुरात आले होते. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भरणे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, मी सोलापूरचा पालकमंत्री आहे. मला वेदना आणि दुःख होतं. चार चार दिवस शहरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. समांतर पाणी योजनेसाठी संबंधित काम करणाऱ्यांना आपण पंधरा महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. ते काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. शहरात वाहतूक कोंडीचा विषय आहे, त्यावर उपाय म्हणून बाह्यवळणाचा विषय मार्गी लावण्यात येईल. सोलापूर विद्यापीठात येत्या वर्षभरात १४ कोटींचे अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभारण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांची काळजी घेणे, हे पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडत आहे. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्याची आणि शहराची काळजी घेणे, हे पालकमंत्र्याचं कामच असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळसाहेब थोरात यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अडचणी दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही भरणे यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, लाकडी-निंबोडी ही इंदापूर-बारामतीसाठीची योजना जुनीच आहे, त्यामुळे पाणी पळविण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आगामी काळात सोलापूरकरांच्या पाणी प्रश्नासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचं ही पालकमंत्र्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.