आमदार पाचपुतेंना धोक्याची घंटा : राजकीय वारं बदलतयं

सत्ता परिवर्तन आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या गावातच झाल्याने त्यांच्यासाठीही धोक्याची घंटा समजली जात आहे.
Kashti Various Executive Society
Kashti Various Executive SocietySarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - सहकार क्षेत्रात देशात नावाजलेली काष्टी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत 40 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. हे सत्ता परिवर्तन आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या गावातच झाल्याने त्यांच्यासाठीही धोक्याची घंटा समजली जात आहे. ( Danger bell for MLA Pachputen: Political winds are changing )

भगवानराव पाचपुते यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत माजी अध्यक्ष कैलास पाचपुते यांच्या गटाने सर्व जागा जिंकत मोठा धक्का दिला. भगवानरावांच्या पाठिशी आमदार बबनराव पाचपुते असले तरी, त्यांचे कार्यकर्ते विरोधकांच्या गटात डेरेदाखल होते. हा निकाल तालुक्याच्या राजकारणात दखल घेणारा ठरलाच शिवाय काष्टीत आमदार पाचपुते यांच्यासाठी धोक्याची घंटा समजला जातो. भगवानरावांच्या चुकांची पध्दतशीर फायदा उठवित कैलास पाचपुते यांनी केलेले निवडणुकीचे 'मायक्रो -प्लॅनिंग' निकालात उतरले.

Kashti Various Executive Society
'काष्टी'त आमदारांचा पराभव : कैलास पाचपुते गटाचा विजय

सहकारमहर्षी काष्टी सहकारी सोसायटी निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांचे खद्दे समर्थक म्हणून भगवानराव पाचपुते ओळखले जातात. भगवानराव पाचपुते यांनी यांनी कारभार करताना संचालक विठ्ठलराव काकडे व व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांच्याविरुध्द एकाचवेळी घेतलेला पंगा अंगाशी आला. हे दोघेही कैलास पाचपुते यांच्या गोटात दाखल झाले आणि तेथूनच भगवानराव हटाव मोहिमेचा श्रीगणेशा झाला.

खासदार, आमदार जरी भगवानरावांच्या बाजूने असले तरी कैलास पाचपुते यांच्या बाजूने भगवानराव विरोधकांची फौजच उभी राहिली. कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांना सगळीच रसद पुरविली. राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांनी उघड तर माजी आमदार राहुल जगताप यांचीही छुपी मदत झाल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी ऐनवेळी भगवानरावांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला. त्याचाही परिणाम निकाल दिसला. शांत डोक्याने बारकावे तपासत कैलास पाचपुते यांनी निवडणुकीत दोन वर्षे केलेले नियोजन निकालात स्पष्ट जाणवले. आमदार पाचपुते यांचे अनेक कार्यकर्ते खुलेआम कैलास पाचपुते यांना मदत करीत असल्याने भगवानराव पाचपुते यांच्याविरुध्द सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एकवटल्याचे दिसले. यातच न्यायालयातून आलेले 99 सभासद निर्णायक ठरले आणि त्यातील बहुतेक कैलास पाचपुते यांच्यासोबत राहिले.

Kashti Various Executive Society
नागवडेंचे पुढचे टार्गेट काष्टी

सदाअण्णांची उणिव आणि कैलासतात्यांचा आधार

या निवडणूक निकालाने काष्टीत राजकारण बदलत असल्याचे चित्र समोर आले. आमदार पाचपुते यांच्यासाठी हा धोका आहे. जेष्ठ दिवंगत नेते सदाशिव पाचपुते यांची राजकारणातील किंगमेकर ही इमेज अनेकांना आठवली. त्यांची उणिव निवडणुकीत जाणवली. आता त्यांची जागा कैलासतात्या पाचपुते घेत असल्याची चर्चा असून काष्टीकरांना त्यांचा वाटणारा आदर या निवडणुकीत अधोरेखित झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com