परिचारकांनी वाढविले समाधान आवताडेंचे टेन्शन; इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश!

दामाजी साखर कारखाना : इच्छूकांनी अर्ज भरावेत; छाननीनंतर भूमिका स्पष्ट करण्याचे प्रशांत परिचारकांचे सूतोवाच
Prashat Paricharak-Samadhan Autade
Prashat Paricharak-Samadhan Autadesarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी परिचारक गटाचे अर्ज स्वतंत्रपणे दाखल होणार आहेत. इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत, छाननीनंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी निवडक कार्यकर्त्यांबरोबर बोलताना स्पष्ट केले. (Damaji Sugar Factory : Prashant Paricharak orders those interested to fill up the application)

दरम्यान, प्रशांत परिचारक यांच्या या भूमिकेमुळे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) गटाचे टेन्शन वाढणार आहे. परिचारक गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर दोघांच्या मतांत फटाफूट होऊन राष्ट्रवादी आणि समविचारीला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Prashat Paricharak-Samadhan Autade
मोठी बातमी : शिरूर कोर्ट परिसरात गोळीबार; पत्नीचा जागीच मृत्यू; सासू गंभीर जखमी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक  युटोपियन कारखाना कार्यस्थळी घेण्यात आली. यापूर्वी कार्यकर्त्यांनीही बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय प्रशांत परिचारकांवर सोपवला होता. त्यानंतर कारखान्याचे संस्थापक कि. रा. मर्दा यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आजी माजी आमदार एकत्र आल्यामुळे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा माध्यमांसह सभासदांमध्ये सुरु झाली होती.

Prashat Paricharak-Samadhan Autade
राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी महाडिकांनी अशी लावलीय फिल्डिंग!

दुसरी समविचारीच्या बैठकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड नंदकुमार पवार यांनीही परिचारकांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करावा. तालुक्यातील कारखानदारी वाचवण्यासाठी लक्ष द्यावे, त्यामुळे कारखानदारी चालविणे व टिकवण्याच्या दृष्टीकोनातून परिचारकांची भूमिका महत्वाची मानली जावू लागली होती. दरम्यान, युटोपियन कारखान्यावर झालेल्या बैठकीवेळी परिचारक यांनी मंगळवेढ्यातील समर्थकांचे दामाजी कारखाना निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याबाबतची भूमिका ऐकून घेतली.

Prashat Paricharak-Samadhan Autade
पंतप्रधान मोदींचा देहू दौरा; भाजपने सोपवली हर्षवर्धन पाटलांकडे महत्वाची जबाबदारी!

कार्यकर्त्यांशी बोलताना परिचारक म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी चालविणे सोपे नाही, ते फार अडचणीचे झाले आहे. साखरेचे दर वारंवार कमी जास्त होतात. कर्मचारी पगार, ऊस बिल वेळेवर देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दामाजी कारखान्याबाबत पक्षीय राजकारण न आणता ही कारखानदारी टिकली पाहिजे, या कारखान्याने अनेकांचे संसार उभे केले आहेत, ते मोडता कामा नये, असे सांगत तूर्त अर्ज दाखल करा. छानणीनंतर एकत्रितपणे बसून त्याबाबत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे परिचारक यांनी सांगितले.

Prashat Paricharak-Samadhan Autade
राष्ट्रवादीच्या नेत्याचं गाव फोडून शेजारच्या झेडपी गटाला जोडले!

बैठकीसाठी दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, जयंत साळे, रामकृष्ण नागणे, युन्नुस शेख, शिवानंद पाटील, नंदकुमार हावनाळे, गौरीशंकर बुरकूल, बापूराया चौगुले, काशीनाथ पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव जानकर, राजू पाटील, कन्हैया हजारे, गोपाळ भगरे, नामदेव जानकर, बाळासाहेब चौगुले, बाबासाहेब पाटील, सिध्देश्‍वर कोकरे, कांतीलाल ताटे, उत्तम घोडके, भारत पाटील आदी उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com